Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रWeather Update : राज्यात पावसाची पुन्हा विश्रांती? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

Weather Update : राज्यात पावसाची पुन्हा विश्रांती? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

मुंबई | Mumbai

ऑगस्ट महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात बरसण्यास सुरुवात झाली आणि अनेकजण सुखावले. ८ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या पावसानं पुढील काही दिवसांत राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोर धरला.

- Advertisement -

परंतु आता आजपासून (सोमवार) मान्सून कमकुवत झाला आहे. यामुळे पुढील तीन दिवस कुठेही मुसळधार पाऊस पडणार नाही. पुढील तीन, चार दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम अन् मध्य महाराष्ट्रात मध्य स्वरुपाच्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे. आता राज्यात १३ तारखेनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट होती. या महिन्यात ५८ टक्के कमी पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पावसाची तूट केवळ ७ टक्के होती. राज्यात पावसाची सरासरी ७४१.१० मिमी आहे. आतापर्यंत ६९२.७० मिमी पाऊस झाला आहे. पुणे जिल्ह्यात सात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग पूर्व विभागात कमी पाऊस झाल्यामुळे केला जात आहे. या भागातील पिकांसाठी हे पाणी सोडले आहे. त्याचा फायदा शेतीला होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या