Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Weather Update : पुढील तीन दिवस 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाची...

Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; तुमच्या जिल्ह्याचा अंदाज काय?

मुंबई | Mumbai

आज (शनिवार) मुंबई, पुणे यासह राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस (Rain) कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे. दुपारपासून मुंबईतील लोअर परळ, दादर, वरळी, चर्चगेट, सायन, कुर्ला, घाटकोपर, पवई आणि भांडूप या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यानंतर आता भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी १० जूनपर्यंत मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा आणि ईशान्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवली आहे.

- Advertisement -

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर गुजरात (Uttar Gujarat) आणि उत्तर बांगलादेशात (Uttar Bangladesh) निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे, ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरापर्यंतचा मान्सूनचा (Monsoon) प्रवाह सध्या मंदावला आहे. परंतु १० जूनपर्यंत तो पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे.

YouTube video player

विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, लातूर, नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो, आणि काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बरसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाने स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांना (Farmer) सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी वादळ आणि विजांच्या कडकडाटादरम्यान शेतात काम करणे टाळावे आणि झाडांखाली किंवा मोकळ्या जागेत आश्रय घेऊ नये, असे आयएमडीने सांगितले आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे पिकांच्या नुकसानीचा (Damge) धोका टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्याला काय अंदाज?

मध्य महाराष्ट्र – नाशिक, जळगाव, धुळे, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर येथे तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरण असेल. तर पुण्यातील घाट परिसरात मध्यम पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

कोकण व मुंबई – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर येथे ६ ते १० जून दरम्यान हलक्या सरींसह ढगाळ वातावरण असणार आहे. तसेच काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट असणार आहे.

मराठवाडा – जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली आणि परभणी येथे वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

विदर्भ – नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे हलका पाऊस आणि वादळाची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...