Tuesday, June 25, 2024
Homeमुख्य बातम्या'या' तारखेपर्यंत 'महाराष्ट्रात ना थंडी, ना गारपीट, ना पाऊस'

‘या’ तारखेपर्यंत ‘महाराष्ट्रात ना थंडी, ना गारपीट, ना पाऊस’

नाशिक | Nashik

- Advertisement -

पाऊस व गारपीटीच्या (Rain and Hail) येणाऱ्या वृत्तांमुळे द्राक्ष, कांदा व इतर पिके घेणारे महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकरी धास्तावले आहेत. अशा बातम्यांकडे दुर्लक्षच व्हावे असे वाटते.कारण संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार दिवस (दि.२६) पर्यंत थंडी तर नाहीच परंतु, कोणतीही गारपीट व पावसाची शक्यता जाणवत नाही, असा अदांज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Meteorologist Manikrao Khule) यांनी वर्तविला आहे…

सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला संपूर्ण महाराष्ट्र व मध्य भारताच्या मध्यातून एकापुढे एक सरळ अशा प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांच्या साध्या प्रणाल्या आहेत. हवेच्या (Air)या उच्च दाबाच्या अँटीसायक्लोन प्रणाल्यांच्या मध्यातून छेदून जाणाऱ्या पूर्व-पश्चिम रेषे(‘रीज’) मुळे उत्तर भारतातून थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव करणारी नकळत एक पूर्व-पश्चिम हवेच्या उच्च दाबाची काल्पनिक भिंतच महाराष्ट्रात (Maharashtra)तयार झाली आहे, असेच समजावे. यामुळेच उत्तर भारतातून ईशान्य दिशेकडून थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रातून सध्या २४० डिग्रीतून म्हणजे नेमक्या विरुद्ध अशा नैरुत्य दिशेकडून वाहणारे वारे अटकाव करत आहेत.

त्यामुळेच आपल्याकडे ईशान्येकडून थंडी (Cold) घेऊन येणारे वारे ठप्प झाले आहेत. त्यामुळे सध्या उत्तर भारतात जबरदस्त पाऊस, बर्फ, थंडी पडत असूनही आपल्याकडे पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झालेली जाणवत आहे.याशिवाय महाराष्ट्रात विशेष कडाक्याची थंडी देखील सध्या जाणवत नाही. परंतु, महाराष्ट्रात पुढे थंडीची आवर्तने येणार असून पुढील चार दिवसा(दि.२६जानेवारी) नंतर वातावरणात काहीसा बदल जाणवण्याची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या