Tuesday, May 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ; नाशिकच्या पालकमंत्रीपदी...

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ; नाशिकच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागणार?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गेल्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) महायुती सरकार अस्तित्वात आल्यावर डिसेंबर 2024 मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. या विस्तारावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे भुजबळ काहीसे नाराज झाले होते. यानंतर त्यांनी विविध माध्यमातून आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. अखेर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली असून, त्यांनी आज सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह पन्नास मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे आता भुजबळ यांना कोणत्या खात्याची जबाबदारी मिळते हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. बीडमधील (Beed) संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती. अखेर आज ही चर्चा खरी ठरली असून, भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

सात दिवसांपूर्वीच भुजबळांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात सात दिवसांपूर्वीच भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याबाबतची चर्चा आणि निर्णय झाला होता. त्यानंतर तो भुजबळ यांना कळविण्यात आला होता. त्यानंतर भुजबळ यांनी देखील आज माध्यमांशी बोलताना आपल्याला एवढंच सांगण्यात आलं की, राज्य मंत्रिमंडळात माझी वर्णी लागत असून, मंत्रि‍पदाचा शपथविधी मंगळवारी सकाळी दहा वाजता होईल, असे म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या