Wednesday, June 26, 2024
Homeनाशिकआर.बी.एच कन्या विद्यालयास महाराष्ट्र समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार..

आर.बी.एच कन्या विद्यालयास महाराष्ट्र समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार..

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

महात्मा गांधी विद्यामंदिर (Mahatma Gandhi Vidyamandir) संचलित आर.बी.एच कन्या (R.B.H Kanya Vidyalay)विद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्या बद्दल सन २०२३-२४ महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कारासाठी (Maharashtra Samaj Bhushan Award) निवड करण्यात आली असुन, लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

विद्यार्थी गुणवत्ता विकास निकष तपासण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत इंडियन टॅलेंट सर्च आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा परीक्षा दरवर्षी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. या परीक्षेसाठी आर बी एच कन्या विद्यालयाच्या इयत्ता आठवी ते दहावी मधून एकूण ७० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता. ही परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर आधारित असते. बहुपर्यायी प्रश्न असतात. ही परीक्षा एमपीएससी यूपीएससीच्या धर्तीवर घेण्यात येते.

अनेक शाळा कॉलेजेस वेगवेगळ्या संस्था महाविद्यालय विद्यापीठ राज्य सरकार केंद्र सरकारच्या अनेक परीक्षा व परीक्षा पद्धती आणि त्या राबविण्याच्या पद्धतींचा सखोल अभ्यास करून प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय जीवनात अत्यंत परिणाम ठरणारी ही परीक्षा पद्धत आहे. या परीक्षा अंतर्गत आर.बी.एच कन्या विद्यालयाला महाराष्ट्र समाज भूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या निवडीसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ .प्रशांत हिरे कोषाध्यक्ष डॉ. स्मिता हिरे संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे,विश्वस्त डॉ.संपदा हिरे डॉ.अद्वय हिरे पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या