Tuesday, July 14, 2026
Homeक्राईमCrime News : राहुरी कृषी विद्यापीठातील कंत्राटी मजुराची निर्घृण हत्या

Crime News : राहुरी कृषी विद्यापीठातील कंत्राटी मजुराची निर्घृण हत्या

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठात (Mahatma Phule Agricultural University) कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या (Youth Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना 2 जूनच्या रात्री गोटुंबे आखाडा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीकांत पोपट दोंदे (वय 27, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. श्रीकांत दोंदे हा विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावरील कार्यालयात ठेकेदाराकडे कंत्राटी मजूर (Contract Labour) म्हणून कार्यरत होता. 2 जून रोजी सायंकाळी 5 वाजता तो नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघाला होता.

- Advertisement -

रात्री सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी कार्यरत असलेले कंत्राटी मजूर (Contract Labour) बंडू बर्डे ड्युटीवर आले असता श्रीकांत नेहमीच्या ठिकाणी दिसून आला नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला असता कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस श्रीकांत दोंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना देण्यात आली. त्यानंतर राहुरी पोलिसांना (Rahuri Police) कळविण्यात आले. माहिती मिळताच श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यासह श्वान पथक व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने श्रीकांत दोंदे याच्यावर 10 ते 15 वार करून हत्या (Murder) केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एक महिला व दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मयत श्रीकांत दोंदे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहिंण असा परिवार आहे. या घटनेमुळे गोटुंबे आखाडा व राहुरी विद्यापीठ कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

ताज्या बातम्या

Nashik News : ​ सावळघाटात भीषण अपघात; चार जण ठार, एक...

0
पेठ | प्रतिनिधी Peth नाशिक-पेठ रस्त्यावरील सावळघाटात आज सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. पेठ-दिंडोरी हद्दीलगत एका भरधाव ट्रकचे ब्रेक फेल...