Tuesday, March 25, 2025
Homeनगरराहुरी विद्यापीठाच्या फुले-265 ऊस वाणाने शेतकर्‍यांच्या जिवनात भरला गोडवा

राहुरी विद्यापीठाच्या फुले-265 ऊस वाणाने शेतकर्‍यांच्या जिवनात भरला गोडवा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University), राहुरीच्या (Rahuri) पाडेगाव (Padegav) येथील ऊस संशोधन केंद्रामार्फत (Sugarcane Research Center) कोएम-0265 (फुले 265) हा उसाचा वाण (Sugarcane varieties) महाराष्ट्रात सन 2007 मध्ये आडसाली (Adsali), पूर्वहंगाम आणि सुरू या तीनही हंगामात लागवडीसाठी शिफारस करण्यात आला. त्यानंतर सन 2009 मध्ये हा वाण गुजरात (Gujarat), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), कर्नाटक (Karnataka), महाराष्ट्र (Maharashtra) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) या राज्यात अखिल भारतीय ऊस संशोधन संस्था, लखनऊ यांनी शिफारशीत केला. हा वाण को-87044 या वाणापासून निवड पध्दतीने तयार करण्यात आला. या वाणाने शेतकर्‍यांच्या जिवनात गोडवा भरला असून ग्रामीण भागातील शेतकरी मालामाल होत आहेत.

- Advertisement -

सुरुवातीला फुले-265 (Phule 265) या वाणाला बर्‍याच साखर कारखान्यांनी गाळपासाठी (Sugar Factories) नकार दिला होता. त्यावेळी कारखान्यांचे म्हणणे असे होते, या फुले-265 (Phule 265) वाणाचा साखर उतारा फार कमी आहे. परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनांती दाखवून दिले, फुले-265 या वाणाचा तीनही हंगामात सरासरी साखर उतारा 14.40 टक्के, तर तुल्य वाण को-86032 मध्ये साखरेचे प्रमाण 14.47 मिळाले. फुले-265 हा वाण मध्यम ते उशिरा पक्व होणारा असून थंडीचा कालावधी मिळाल्यावर डिसेंबर-जानेवारीनंतर हा वाण तोडणीस योग्य असतो. सुरु ऊस 12 महिन्यांनी, पूर्वहंगामी ऊस 14 महिन्यांनी आणि आडसाली ऊस 16 महिन्यांनी तोडणी केल्यास फुले-265 या वाणापासून साखर उतारा चांगला मिळतो.

साखर कारखान्यांनी ऊस तोडणीचे नियोजन (Sugarcane harvesting planning by sugar mills) करताना लवकर पक्व होणार्‍या वाणांची तोडणी डिसेंबरपर्यंत करावी आणि फुले-265 या वाणाची तोडणी जानेवारीनंतर केल्यास साखर उतारा चांगला मिळेल. हा वाण शेतकर्‍यांच्या पसंतीस पडला आहे. या वाणाचे खोडव्याची फूट व वाढ चांगली असल्याने एकंदर उत्पन्नही चांगले मिळते. जवळपास 13 खोडवे शेतकर्‍यांनी घेतल्याचे उदाहरणे आहेत. चाबूककाणी, मर व लालकुज या रोगांना प्रतिकारक आहे. खोडकीड, कांडीकीड, शेंडेकीड व लोकरी मावा या किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तालयाने सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना नुकतेच पत्राद्वारे सूचित केले, फुले-265 या ऊस वाणाच्या लागवडीस शासनाची परवानगी असून या वाणाचा ऊस लागवडीस व गाळपास योग्य असल्याचे प्रमाणित झाले आहे. म्हणून ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या फुले-265 या ऊस वाणाची नोंद कारखान्यांनी घेण्यात यावी. जे साखर कारखाने फुले-265 वाणाच्या ऊस लागवडीची नोंद घेणार नाही, त्या कारखान्यांचा गाळप परवाना नाकारण्यात येईल आणि शेतकर्‍यांच्या अशा तक्रारी पुन्हा प्राप्त होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ऊस उत्पादनातील ही किमया फुले-265 मुळेच शक्य झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी अर्थशास्त्र विभागाने या वाणाच्या प्रभावाचा अभ्यास केला. त्यामध्ये असे आढळून आले, सन 2009-10 ते 2016-17 या 9 वर्षात शेतकरी आणि साखर कारखानदार यांना 31 हजार 681 कोटी रुपये इतका आर्थिक फायदा झालेला आहे.

-कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

फुले-265 वाणाचा साखर उतारा तीनही हंगामात चांगला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये फुले-265 वाणाखाली सातत्याने क्षेत्र वाढत असून 32 टक्के क्षेत्रावर याची लागवड केली जात आहे. फुले-265 या वाणाने शेतकर्‍यांमध्ये सुबत्ता आणली आहे. या वाणाची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीने शिफारस केली आहे.

– संचालक संशोधन डॉ. शरद गडाख

फुले-265 वाण हा क्षारपड जमिनीसाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्रात ऊस लागवड क्षेत्रापैकी 1.50 लाख हेक्टर क्षेत्र हे क्षारपड असून त्या ठिकाणी आडसाली लागवडीसाठी फुले -265 ला पर्याय नाही.

– ऊस विशेषज्ज्ञ डॉ. भरत रासकर

चालू वर्षी राज्याचे सरासरी ऊस उत्पादन हेक्टरी 96 टन मिळाल्याचे साखर आयुक्तांकडील उपलब्ध आकडेवारी वरून दिसून येते. या वाणाने नैराशाने ग्रासलेल्या शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती केली आणि खर्‍याअर्थाने शेतकरी सधन आणि संपन्न झाला, कर्जबाजारीतून मुक्त झाला. काही शेतकर्‍यांनी फुले 265 ची किमया अशी नावे आपल्या ट्रॅक्टरला, जीपला आणि घराला दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात उसाच्या फुले-265 विक्रमी उत्पादनातून अनेक शेतकर्‍यांनी चारचाकी गाड्या खरेदी केल्या आहेत. यावरुन राज्याच्या विकासात विशेषतः ऊस पिकामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे योगदान दिसून येते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...