मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या (Woman Oppression) घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच बदलापूर (Badlapur) येथील चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्यानंतर आता राज्यातील विविध जिल्ह्यांत महिला अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. या अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यातील विरोधीपक्ष चांगलेच आक्रमक झाले असून येत्या २४ ऑगस्टला महाविकास आघाडीच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Badlapur School Case : मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर आरोप; म्हणाले, “बदलापूरचे आंदोलन हे राजकीय दृष्ट्या…”
यासंदर्भातील माहिती आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) प्रमुख नेत्यांनी मुंबईत पार पडलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना दिली. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, खासदार वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.
हे देखील वाचा : बदलापूर प्रकरणातील आरोपीला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
यावेळी बोलतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आज आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. कारण, महाराष्ट्र मनाने अस्वस्थ असून पेटलेला आहे. त्यामुळे आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. सरकारने तातडीने महिला अत्याचाराच्या घटना रोखाव्यात. तसेच येत्या २४ ऑगस्टला आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे राऊत यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Sinnar News : साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपी ताब्यात
तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, बदलापूरच्या घटनेने (Badlapur Sexual Abuse Case) समाजमन हेलावून गेले आहे. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रातील लहान मुली देखील सुरक्षित नाही. महाराष्ट्रातील घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे.या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची (BJP and RSS) असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले. आम्हाला यात राजकारण करायचे नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून अकार्यक्ष सरकारला आरसा दाखवण्याचे काम जनता करेल,”असे पटोले यांनी म्हटले.
हे देखील वाचा : गृहमंत्रीजी, माझी पोलीस सुरक्षा तातडीने हटवा; सुप्रिया सुळेंनी का केली विनंती?
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटनांवर आणि महायुती सरकारच्या कारभारबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. येत्या २४ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये महाविकास आघाडीमधील आम्ही तिन्ही पक्ष सामिल होणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच बदलापूरच्या घटनेत शाळा आणि इतर प्रशासनाने दिरंगाई केली असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. याशिवाय सरकारकडूनही कारवाई करण्याबाबत दिरंगाई झाली. त्यातही बदलापूर आंदोलनावर सत्तापक्षातून येणाऱ्या प्रतिक्रिया दुर्दैवी आहेत. त्यामुळे सरकारने हा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळावा, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा