Tuesday, November 5, 2024
HomeराजकीयMahavikas Agahdi Protest : शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल; म्हणाले, "मालवणमधील पुतळा सरकारच्या…"

Mahavikas Agahdi Protest : शरद पवारांचा महायुतीवर हल्लाबोल; म्हणाले, “मालवणमधील पुतळा सरकारच्या…”

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी (Shivaji statue collaps) आज सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया परिसरात मविआ नेत्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह मविआचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलतांना शरद पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मालवणमधील शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा म्हणजे महायुती सरकारचा भ्रष्टाचाराचा नमूना असल्याचा हल्ला शरद पवार यांनी केला.

हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे धक्कादायक विधान केले. राज्यभरात असलेले शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमूना आहे. तो पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. हा जनमानसात समज निर्माण झाला आहे. हा शिवप्रेमी लोकांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली.”

हे देखील वाचा : LPG Price Hike : महिन्याची सुरूवात महागाईने! गॅस सिलिंडर महागला… किती रुपयांनी वाढले दर?

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासून गेट वे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून पर्यटकांना बाहेर काढले आहे. यावेळी जय शिवाजी जय भवानी, महाराज आम्हाला माफ करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले. हुतात्मा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन मविआच्या आंदोलनाला सुरूवात झाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या