Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाला मान्यता मिळणार का?, मविआ सरकार राहणार की जाणार? भवितव्य नाशिकच्या...

शिंदे गटाला मान्यता मिळणार का?, मविआ सरकार राहणार की जाणार? भवितव्य नाशिकच्या हाती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शिवसेनेचे बंडखोर मंत्री आमदार एकनाथ शिंदे (Shivsena MLA Eknath Shinde) यांच्या गटाने आमदारांच्या सहीचे एक पत्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना लिहिले आहे. या पत्रावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटनेते तर भरत गोगावले (Bharat Gogavale) प्रतोद म्हणून नेमण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे….

- Advertisement -

परंतु, पण असे कुठलेही पत्र आपल्याला प्राप्त झालेले नसल्याचे झिरवळ यांनी सांगितले. आज (दि २३) सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली…

झिरवाळ म्हणाले की, कायद्यात पक्षप्रमुखाने गटनेता निवडायचा असतो आणि गटनेत्याने प्रतोदची निवड करावयाची असते. याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister Udhav Thackeray) यांनी आधी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदी निवडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांना गटनेतेपदी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

दरम्यान, याआधी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी बंडखोर आमदारांना तात्काळ बैठकीला उपस्थित राहण्यासाठीची नोटीस बजावली होती. या नोटीसीवर बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नोटीस अवैध असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांच्या गटाने भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड केली. त्यानंतर ३४ आमदारांच्या गटाच्या सहीचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याकडे पाठवले आहे. या पत्रावर आज झिरवाळ यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

विधानसभा उपाध्यक्षांची भूमिका का महत्वाची?

जर शिंदे गटाला वेगळी मान्यता देण्याचा अर्ज करण्यात आला तर तो विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे जाईल. या अर्जावर झिरवळ यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. झिरवळ यांनी जर का या गटाला मान्यता दिली तर सरकार कोसळेल.

जर झिरवळ यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला मान्यता दिली नाही, तर प्रकरण न्यायालयात जाईल. जर उद्धव ठाकरे सरकारविरोधात अविश्वास ठराव आला तर तो त्यांचे संचलनदेखील करण्याची जबाबदारी झिरवळ यांच्यावर येईल. त्यावेळीदेखील त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.

झिरवळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होणयाआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ज्या राष्ट्रवादीने अजून या सगळ्या घडामोडींवर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यांचे पत्ते अजूनही गुलदस्त्यातच आहेत. त्यामुळे झिरवळ काय निर्णय घेणार ते महत्वाचे ठरणार आहे. याबाबतची माहिती कायदेतज्ञ अशोक चौसाळकर यांनी बीबीसीला दिली.

राज्याचे राजकारण आता नाशिकभोवती का?

आमदार नरहरी झिरवळ (MLA Narhari Zirwal) हे राष्ट्रवादीचे दिंडोरी (NCP Dindori) येथील आमदार (MLA) आहेत. त्यांची उपाध्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. झिरवळ राष्ट्रवादीचे एकनिष्ठ शिलेदार आहेत. स्वभाव अतिशय साधा आणि नम्र असाच आहे. गावाकडे साधे घर आहे. आदिवासी आमदार असल्यामुळे प्रत्येक सण उत्सवात ते सहभागी होतात. त्यांचे अनेक व्हिडीओ अनेकदा व्हायरल झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या