Friday, February 6, 2026
Homeनगरमहाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळणार

महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळणार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यामध्ये महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) अत्यंत चांगले वातावरण आहे. याउलट महायुतीमध्ये खूप मारामारी आहे. त्यांची आणि महाविकास आघाडीची तुलना नको असे सांगताना राज्यातील 125 जागांवर सहमती झाली असून उर्वरित जागांवरही सर्व सहमतीने निर्णय होईल. येत्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत दोन-तीन बैठका झाल्या असून 125 जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित जागांवर गणेश विसर्जननंतर बैठक होऊन सहमती होईल. समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) 180 पेक्षा जास्त जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

YouTube video player

याचबरोबर महायुतीमध्ये सध्या फक्त मारामारी सुरू आहे. त्यांची दररोज भांडणे आपण पाहत आहोत. त्यामुळे त्यांची आणि महाविकास आघाडीची तुलना नको असेही आमदार थोरात यांनी म्हटले असून इतर समविचारी पक्षांना बरोबर घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. तसेच महाराष्ट्रात झालेली पक्ष फूट किंवा कुटुंबातील फूट ही राज्यातील जनतेला आवडली नसून लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) त्याचा प्रत्यय महायुतीला आला आहे. बारामतीमध्ये (Baramati) व्हायरल झालेले पत्र हे प्रातिनिधीक असू शकते असे सांगताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कधीही धर्माचा भेद करत नाही. बंधुभाव ही आपल्या देशाची ताकद असून ती वाढवण्यासाठी महाविकास आघाडी काम करत आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभेत मोठ्या मताधिक्याने 180 जागा जिंकू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...