Sunday, June 23, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Political News : लोकसभेच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची समिती गठीत

Maharashtra Political News : लोकसभेच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची समिती गठीत

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचा (Mahayuti) सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले आहेत. या समितीच्या आढाव्यानंतर इंडिया आघाडीच्या (India Alliance) जागावाटपाच्या प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात होईल…

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती? मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांच्या (Seats) वाटपासंदर्भात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तीन पक्षात चर्चा सुरू होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या तीन अशा नऊ जणांची ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बसवराज पाटील आणि नसीम खान, शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई तर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे.

Aaditya Thackeray : “पेंग्विनमुळे ५० कोटींचा नफा पण जे पळून गेले ते स्वतःसाठी…”; आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

महाविकास आघाडीची ही समिती (Committee) जागा वाटपासंदर्भात चर्चा करून जागा वाटपाचा तिढा सोडवणार आहे. कोणत्या पक्षाकडे कोणता मतदारसंघ गेल्यास विजयाची शक्यता अधिक आहे हा निकष समोर ठेवून ही समिती जागा वाटपावर चर्चा करेल. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेळ मिळावा म्हणून लवकरात लवकर जागा वाटप पूर्ण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.

Sharad Pawar : “भाजपकडे बहुमत होते तर…”; देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रपती राजवटीवरील गौप्यस्फोटाबाबत शरद पवारांचे प्रत्युत्तर

दरम्यान, तीनही पक्षांनी लोकसभेची निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतल्याने लोकसभेच्या जागा वाटपात प्रचंड रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. कारण हे तिन्ही पक्ष प्रथमच एकत्र लढविणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सत्तेत सहभागी झालेल्या खासदारांचा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार हे ठरवताना या समितीची कसोटी लागणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

NCP Crisis : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार, अजित पवार गटाला नोटीस; उद्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश

- Advertisment -

ताज्या बातम्या