Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMahavikas Agahdi Protest : 'महाराष्ट्रद्रोह्यांना 'गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय थांबू नका';...

Mahavikas Agahdi Protest : ‘महाराष्ट्रद्रोह्यांना ‘गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय थांबू नका’; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मविआचे सरकारविरोधात 'जोडे मारो' आंदोलन

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी (Shivaji statue collaps) आज सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया परिसरात मविआ नेत्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. या मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह मविआचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यभरात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राने पहिला नौदल दिन मोठ्या दिमाखात साजरा केला होता. पण त्याचवेळी घाईघाईने भ्रष्टाचार करून शिवरायांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. माफी तुम्ही कुणा कुणाची मागणार? घाईगडबडीने संसद भवन उभे केले म्हणून तुम्ही माफी मागणार? दिल्लीच्या विमानतळाची छत कोसळत आहेत, सर्व गोष्टींबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसे आपले महामहीम राष्ट्रपती म्हणाले आता बस्स झाले, महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केला आहे. महाराष्ट्र धर्माचा अपमान केला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि करणार नाही. महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय थांबू नका, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : LPG Price Hike : महिन्याची सुरूवात महागाईने! गॅस सिलिंडर महागला… किती रुपयांनी वाढले दर?

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आले आहे. भ्रष्टाचार करुन छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे काम सरकारने केले आहे. फक्त शिवरायांचा पुतळा कोसळला नाही तर सरकारने महाराष्ट्राचा अवमान केला आहे. महाराजांच्या अवमान करणाऱ्यांविरोधात आपण हे आंदोलन केले. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांनी वयाचे बंदन झुगारुन आंदोलनास आले, त्याचे कौतुक आहे, असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविण्यासाठी आग्रही

छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करण्यात आला. तर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले होते. तसेच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही ( MVA Jode Maro Andolan ) यावेळी देण्यात आल्या.

हे देखील वाचा : त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! नाशिक-डहाणू नवीन मार्गाच्या अंतिम लोकेशन सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

आधी परवानगी नाकारली, नंतर बॅरिगेट्स हटवले

मविआच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आज रविवारचा दिवस आहे. या भागातील कार्यालयांना सुट्टी आहे. असे असताना आमच्या आंदोलनाला परवानगी का नाही? असा सवाल महाविकास आघाडीने केला. त्यानंतर हा मोर्चा अडवला जाणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली. यानंतर लावलेले बॅरिगेटही हटवण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा आता गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या