Saturday, July 27, 2024
Homeनाशिकचुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई

नाशिकरोड। प्रतिनिधी Nashikroad

महावितरणने Mahavitaran वीज ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग ( Electrial Meter Reading )अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणार्‍या तसेच वीजबिल Electricity Bills दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास, मनस्ताप देणार्‍या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सींना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे.

- Advertisement -

पुणे जिल्ह्यातील दोन तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सींविरुद्ध ( Meter Readings Agencies ) गेल्या चार दिवसांमध्ये थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut ) यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीज मीटरचे रीडिंग 100 टक्के अचूक झालेच पाहिजे, असे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी 1 फेब्रुवारीला राज्यभरातील मीटर रीडिंग एजन्सीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला होता.

चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणार्‍या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई सोबतच एजन्सी व संबंधित कर्मचार्‍यांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.

एजन्सीने केलेल्या मीटर रीडिंगची पडताळणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या पडताळणीमध्ये बारामती परिमंडलमधील परिमल एंटरप्रायजेस, पांडरे, ता. बारामती (सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायजेस, सादलगाव, ता. शिरूर (केडगाव विभाग), कल्याण परिमंडलमधील सुप्रीम पॉवर सर्व्हिसेस, अंधेरी (वसई विभाग), नांदेड परिमंडलमधील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल, दहेली, ता. किनवट (भोकर विभाग), औरंगाबाद परिमंडलमधील नंदिनी एंटरप्रायजेस (औरंगाबाद शहर विभाग 2) आणि अकोला परिमंडलमधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (अकोला शहर विभाग) या सहा एजन्सींद्वारे सुरू असलेल्या मीटर रीडिंगच्या कामात कुचराई होत असल्याचे आढळून आले. परिणामी या एजन्सीविरुद्ध थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या बडतर्फ एजन्सीकडून वीज मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा हेतूपुरस्सर शेरा देणे, महावितरणला अचूक रीडिंग घेत असल्याची खोटी माहिती देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून आले. यामुळे महावितरणच्या महसुली नुकसानीसोबतच वीज ग्राहकांनादेखील चुकीच्या वीजबिलांच्या दुरुस्तीसाठी मनस्ताप व त्रास झाल्याचे दिसून आले. त्याची गांभीर्याने दखल घेत याआधीच दिलेल्या इशार्‍याप्रमाणे महावितरणकडून मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर कंत्राटदारांना कामात कुचराई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या