Tuesday, March 25, 2025
Homeनगरना. विखे पाटील यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात दुसर्‍यांदा समावेश

ना. विखे पाटील यांचा महायुतीच्या मंत्रिमंडळात दुसर्‍यांदा समावेश

लोणी |वार्ताहर| Loni

राज्याच्या विधानसभेत सलग आठ वेळा शिर्डी विधानसभा मतदार संघाचे (Shirdi Assembly Constituency) प्रतिनिधीत्व आणि सात वेळा विविध विभागांच्या मंत्रीपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे ना.राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा महायुतीच्या मंत्रीमंडळात दुसर्‍यांदा झालेला समावेश अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) राजकीय क्षेत्रात वर्चस्व सिध्द करणारा ठरला आहे. सहकार चळवळीची असलेली पार्श्वभूमी आणि लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील (Padma Bhushan Dr. Balasaheb Vikhe Patil) यांच्या राजकीय सामाजिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणारे ना.विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रातील विविध संस्थांची पद भूषवून या क्षेत्रात नाविन्याची निर्मिती केली. सहकारा बरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपल्या दुरदृष्टीकोनातून संस्थाचा पाया अधिक भक्कम केला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास (Padmashri Dr. Vitthalrao Vikhe Patil Sugar Factory) पुर्ण झालेली 75 वर्ष, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची 50 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि सहकारी बॅकींग क्षेत्रात नावलौकीक प्राप्त केलेल्या प्रवरा सहकारी बॅकेस पुर्ण झालेले 50 वर्ष यासर्वांमार्ग ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभ्यासू नेतृत्व उपयुक्त ठरले आहे.

- Advertisement -

1995 पासून शिर्डी विधानसभा मतदार संघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले. राहाता (Rahata) तालुक्याच्या निर्मिती पासून ते अलिकडच्या काळात स्थापन झालेले अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, काकडीचे विमानतळ, न्यायालयाची स्वतंत्र इमारत अशा अनेक ठळक बाबी या त्यांच्या विकासाच्या वाटचालीतील मानबिंदु ठरले आहेत. विकास कामांच्या सक्रीयतेमुळेच शिर्डी मतदार संघातून सलग आठव्यांदा चांगल्या मताधिक्याने निवडून जाण्याचा विक्रमही त्यांनी नोंदविला आहे.

कोणत्याही मंत्रीपदाची जबाबदारी आली की, त्या विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आहे. सरकार आणि संघटना यांचा योग्य समन्वय साधून काम करण्याचा मोठा अनुभव ना.विखे पाटील यांच्या पाठीशी असल्यामुळे जिल्ह्याच्या विकास प्रक्रीयेला यामुळे गती मिळाल्याचे पाहायला मिळाले. यापूर्वी भाजप सेनेचे सरकार असताना 1997 ते 99 या कार्यकाळात कृषी, जलसंधारण, दूग्ध व्यवसाय या विभागांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. अ‍ॅग्रो अ‍ॅडव्हांटेज हे कृषी क्षेत्रातील अंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख दाखवून दिली होती.

शालेय शिक्षण, विधी व न्याय, परिवहन, बंदरे विकास, गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी लोकहिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिले. अनुदानित शाळांसमोरील कायम शब्द काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतल्यामुळेच अनुदानित शाळांचा मोठा प्रश्न सोडविण्यात यश आले. स्कुलबसचे धोरणही त्यांच्याच कार्यकाळात राज्यात लागू करण्यात आले होते. 2019 नंतर ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. दक्षिण लोकसभा मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी डॉ. सुजय विखे पाटील यांना मिळवून मोठा विजय मिळविला. त्यानंतर जिल्हा पूर्णपणे भाजपमय करण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न राहीले. मागील अडीच वर्षात राज्यात स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये महसूलमंत्री पदाची मोठी जबाबदारी पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर सोपविली. या माध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले.

अहिल्यानगरचे पालकमंत्री म्हणून शासन आपल्या दारी या उपक्रमातून त्यांनी महायुती सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रशासनाच्या सहकार्याने योजनांच्या अंमलबजावणीत अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यात ना.विखे पाटील यांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले. जिल्ह्याच्यादृष्टीने तीन औद्योगिक वसाहतींना उपलब्ध करून दिलेले जागा, निळवंडे धरण कालव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेला पाठपुरावा, गोदावरी कालव्यांच्या नुतनीकरणासाठी 200 कोटी रुपयांचा उपलब्ध केलेला निधी, सावळीविहीर येथे मंजूर झालेले शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, काकडी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीसाठी मंजूर झालेला 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून मतदार संघाच्या विकासाला मोठी गती दिली आहे.

जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीमध्ये येणारे उद्योग ही मोठी उपलब्धी त्यांच्या कार्यकाळात ठरली आहे. भविष्यात अहिल्यानगर शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणे आणि श्रीक्षेत्र नेवासे येथील ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी हा त्यांचा संकल्प असून, जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटनाला नवी दिशा देण्याचाही त्यांचा प्रयत्न असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...