Monday, November 25, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकुणबीच्या तीन पोटजातींचा ओबीसीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीतील २३ मोठे निर्णय

कुणबीच्या तीन पोटजातींचा ओबीसीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीतील २३ मोठे निर्णय

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत २३ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : महायुती सरकारचं सरपंच-उपसरपंचांना मोठं गिफ्ट; मानधनात केली दुप्पटीने वाढ

तसेच राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय बऱ्याच काळापासून ब्राह्मण समाजाची, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी होती, त्याला देखील आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासोबतच दूधाच्या (Milk) अनुदानात वाढ करण्याचा निर्णय देखील महायुती सरकारने (Mahayuti Government) घेतला आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे

१) लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय.(सामान्य प्रशासन)

२) बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी (महिला व बाल विकास विभाग)

३) धान उत्पादकांना दिलासा : आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर (अन्न नागरी पुरवठा विभाग)

४) कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश (इतर मागास बहुजन कल्याण)

५) जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (विधी व न्याय)

६) शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प (सार्वजनिक बांधकाम)

७) करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा (वित्त)

८) यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते
(वस्त्रोद्योग)

९) क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड (महसूल)

१०) ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास)

११) राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दूप्पट वाढ (ग्रामविकास विभाग)

१२) मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प (सार्वजनिक बांधकाम)

१३) हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार (ऊर्जा)

१४) एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार
(परिवहन)

१५) ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ (नियोजन)

१६) राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ (नियोजन)

१७) राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण (कौशल्य विकास)

१८) छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये (उच्च व तंत्रशिक्षण)

१९) अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा (क्रीडा विभाग)

२०) जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी (जलसंपदा विभाग)

२१) श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मुळ मालकांना परत करणार (महसूल)

२२) दूध अनुदान योजना सुरु राहणार, उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान (दूग्ध व्यवसाय विकास)

२३) महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर (सांस्कृतिक कार्य विभाग)

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या