Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्यामहायुती सरकारचा विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ पण चलती मात्र...

महायुती सरकारचा विधीमंडळ समित्यांचा फॉर्म्युला ठरला! भाजप मोठा भाऊ पण चलती मात्र लहान भावांची

मुंबई | Mumbai

राज्यात सध्या भाजप-शिवसेना (BJP-Shiv Sena) आणि अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा सत्तेत समावेश झाल्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांना (MLA) मंत्रीपदापासून दूर राहावे लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता ट्रिपल इंजिन सरकारचा महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ५०-२५-२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. महायुती समन्वय समितीच्या आजच्या बैठकीत हा अंतिम निर्णय होणार असल्याचे बोलले जात असून आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होणार आहे. यात विधानसभा व विधानपरिषदेच्या एकूण २८ समित्यांवर आमदारांची नेमणूक होणार असून समित्यांच्या अध्यक्ष व सदस्यपदांची यादी समन्वय समिती विधीमंडळात देणार असल्याचे समजते.

Shivsena Dasara Melava : यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार; शिंदेंच्या शिवसेनेची माघार, केसरकरांनी सांगितलं कारण

तर विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद उपसभापतींना महायुतीचे (Mahayuti) नेते भेटणार आहेत. विशेष अधिकार समिती, पंचायत राज समिती, रोजगार हमी योजना समिती,आश्वासन समिती, यासह एकूण २५ समित्या विधानमंडळातर्गंत कार्यरत असतात. या समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पदांची यादी समन्वय समिती विधीमंडळात देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, यापूर्वी महामंडळे आणि विविध शासकीय समित्यांवरील नियुक्यांमध्ये ६०:२०:२० चा फॉर्म्युला असावा अशी मागणी भाजपने केली होती. मात्र तीन पक्षांमध्ये भाजपला ५० शिवसेनेला २५ टक्के आणि राष्ट्रवादीला २५ टक्के असे वाटप निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप ५० शिवसेना २५ आणि राष्ट्रवादी २५ असा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादीने धरला आणि या मागणीला आता मान्यता मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

म्हणून महायुती सरकारमध्ये सामील झालो…; महायुतीमधले शतक पुर्ण करताच अजित पवारांचे पत्र

- Advertisment -

ताज्या बातम्या