मुंबई | Mumbai
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. खातेवाटपानंतर जास्त विलंब न लावता दोन दिवसांत मंत्रालयातील दालन आणि बंगले वाटप करण्यात आले आहेत. काही मंत्र्यांना पूर्वीचे आहे तेच बंगले देण्यात आले आहेत. तर काहींच्या बंगल्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र, आता त्र्यांना दालन, बंगल्याच्या वाटपावरून नाराजीचा नवा अंक रंगल्याची चर्चा सुरू आहे.
सोमवारी महायुतीच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्याचेही वाटप करण्यात आले आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार ,खातेवाटप वाद मिटल्यानंतर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीत नाराजी असल्याचे माहिती मिळत आहे. काही मंत्री हे वास्तूशास्त्र आणि इतर काही बाबी लक्षात घेता दालन, बंगले घेतात. मात्र, अचानकपणे यादीच जाहीर झाल्याने मंत्री चांगलेच गडबडून गेले आहेत. दरम्यान, महायुती सरकारमधील ६ राज्यमंत्र्यांपैकी मेघना बोर्डिकर, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांना मंत्रालयात दालन मिळाले नाही. त्याऐवजी या मंत्र्यांना विधानमंडळाच्या पहिल्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे.
कोणत्या नेत्यांना कोणता बंगला मिळाला?
राधाकृष्ण विखे पाटील-रॉयलस्टोन बंगला, पंकजा मुंडे-पूर्णकुटी बंगला, चंद्रशेखर बावनकुळे-रामटेक बंगला, शंभुराज देसाई-मेघदूत बंगला, गणेश नाईक-पावनगड बंगला, धनंजय मुंडे-सातपुडा बंगला, चंद्रकांत पाटील-सिंहगड बंगला, राम शिंदे-ज्ञानेश्वरी बंगला, हसन मुश्रीफ-विशाळगड बंगला, गिरीश महाजन-सेवासदन बंगला, गुलाबराव पाटील-जेतवन बंगला, दादा भुसे- ब- ३ जंजीरा बंगला, संजय राठोड-शिवनेरी बंगला.
मंगलप्रभात लोढा- ब-५ विजयदुर्ग बंगला, उदय सामंत-मुक्तागिरी बंगला, जयकुमार रावल-चित्रकुट बंगला, अतुल सावे-अ- ३ शिवगड बंगला, अशोक उईके-अ-९ लोहगड, आशिष शेलार-रत्नसिंधू बंगला, आदिती तटकरे-प्रतापगड बंगला, शिवेंद्रराजे भोसले-पन्हाळगड बंगला, माणिकराव कोकाटे-अंबर बंगला, जयकुमार गोरे-प्रचितीगड बंगला, नरहरी झिरवाळ- सुरूची ०९ बंगला, संजय सावकारे-अंबर-३२ बंगला, संजय शिरसाट- अंबर-३८ बंगला, प्रताप सरनाईक-अवंती-५ बंगला, भरत गोगावले-सुरूचि- ०२ बंगला, मकरंद पाटील-सुरुचि-०३ बंगला.