Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde : महायुतीची मुंबईतील बैठक रद्द! काळजीवाहू CM एकनाथ शिंदे मूळगावी...

Eknath Shinde : महायुतीची मुंबईतील बैठक रद्द! काळजीवाहू CM एकनाथ शिंदे मूळगावी जाणार

मुंबई । Mumbai

विधानसभेच्या निकालाला आठवडा उलटल्यानंतरही अद्याप महायुतीच्या चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरूच आहे. याच दरम्यान आज मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

- Advertisement -

दोन दिवसानंतर अमित शाहांचा फोन आल्यानंतर पुन्हा बैठक होईल असं सांगण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे साता-याला आपल्या गावी गेल्यामुळे महायुतीची बैठक होणार नसल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल (दि.28) रात्री दिल्लीत अमित शाह (Amit Shah) यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते.

त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली असून, महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नेमकी ही बैठकी कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली आहे याबाबत कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...