Saturday, April 26, 2025
Homeमनोरंजन१३ वर्षांनी पुन्हा 'दे धक्का'; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

१३ वर्षांनी पुन्हा ‘दे धक्का’; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | Mumbai

२००८ साली रिलीज झालेला चित्रपट ‘दे धक्का’ सुपरहिट ठरला. हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आणि चित्रपटातील कलाकारांना तसेच त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisement -

‘दे धक्का २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. अभिनेता सिद्धार्थ जाधवने ट्वीट करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. ‘दे धमाल हसवणुकीचा दुसरा डोस, महेश मांजरेकर दिग्दर्शित, दे धक्का २, तारीख ठरली!!! १ जानेवारी २०२२… थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय… घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय’ या आशयाचे ट्वीट सिद्धार्थ जाधवने केले आहे. ‘दे धक्का २’ लवकरच भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी आहेत.

१३ वर्षापूर्वी दे धक्का चित्रपट आला होता. या चित्रपटाला लोकांची प्रचंड पसंती मिळाली. यामध्ये मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव तसच इतर कलाकारांचे देखील कौतुक झाले. आता हेच कलाकार दे धक्का २ मध्ये देखील पप्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

या चित्रपटामध्ये हे कलाकार इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडनमध्ये धमाल करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता चित्रपटामध्ये आणखी काय मस्ती मज्जा पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...