Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशअ‍ॅपलकडून महुआ मोईत्रा, शशी थरूर यांना इशारा! 'त्या' एका Notification मुळे राष्ट्रीय...

अ‍ॅपलकडून महुआ मोईत्रा, शशी थरूर यांना इशारा! ‘त्या’ एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात खळबळ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रामध्ये (Opposition Leaders) सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हेरगिरीचा गंभीर आरोप केला आहे. आम्हाला स्वत: जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीनेच आपल्याला (Apple Alert On Hacking) यासंदर्भातील मेसेज नोटीफिकेशन पाठवल्याचे या खासदारांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेसचे खासदार शशि थरुर, पवन खेडा तसेच शिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदींबरोबरच आम आदमी पार्टीचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी आपले फोन हॅक करण्याचा प्रत्य होत असल्याचा आरोप केला आहे. अ‍ॅपल आयडीद्वारे जोडलेल्या आयफोन्सना स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्सद्वारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची विरोधी पक्षनेत्यांनी ही माहिती दिली आहे. राजकारण्यांव्यतिरिक्त काही पत्रकारांनाही अ‍ॅपलच्या माध्यमातून अलर्ट मेसेज येत असल्याचे समोर आले आहे. अ‍ॅपलच्या माध्यमातून ज्या नेत्यांना अलर्ट पाठवण्यात आला आहे.

प्रियांका चतुर्वेदींनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये हा मेसेज सविस्तर दिल्याचे दिसत आहे. “अ‍ॅलर्ट – सरकार पुरस्कृत हल्लेखोर कदाचित तुमचा फोन हॅक करत आहेत. आम्हाला अशी शक्यता वाटत आहे. आम्हाला वाटतंय की तुमच्या अ‍ॅपल आयडीशी संलग्न आयफोन त्रयस्थ ठिकाणी बसून हॅक करण्याचे प्रयत्न सरकारकडून मदत मिळणारे हॅकर्स करत आहेत. तुम्ही जे आहात किंवा तुम्ही जे करता, त्यामुळे तुमचे फोन हॅक करण्याचे प्रयत्न होत आहेत.

जर हे हल्लेखोर यशस्वी झाले, तर ते कुठेही बसून तुमच्या फोनमधील संवेदनशील माहिती, संदेश किंवा अगदी कॅमेरा आणि मायक्रोफोनशीही छेडछाड करू शकतात. अर्थात, हेही शक्य आहे की हा अ‍ॅलर्ट चुकीचा असेल. पण तो गांभीर्यानं घ्यावा अशी तुम्हाला विनंती आहे”, असे या संदेशात नमूद करण्यात आले आहे.

कॅश फॉर क्वेश्चन म्हणजेच प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्या प्रकरणी आरोपी असलेल्या महुआ मोइत्रा यांनी ट्वीटरवरुन, “अ‍ॅपलकडून एक मेसेज आणि ई-मेल आला आहे. यामध्ये मला इशारा देण्यात आला आहे की माझा फोन आणि ई-मेल हॅक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,” असे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, ‘सायबर हॅकिंग… अ‍ॅपलने ६ विरोधी नेत्यांना इशारा दिला की ‘स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्सने त्यांचे आयफोन लक्ष्य केले असावे. आपल्या देशात काय चालले आहे.’

विरोधकांच्या दाव्यावर भाजपचा पलटवार

भाजप नेते नलिन कोहली यांनी म्हटले की, महुआ मोइत्रा यांच्यावर गंभीर आरोप आहेत. संसदेच्या समितीसमोर जाऊन त्यांना उत्तर द्यावे लागेल. यापासून लक्ष वळवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. असेही असू शकते की त्यांनी स्वत:च असे करण्याचा प्रयत्न केला असेल आणि आरोप भारत सरकारवर करत असतील.

भाजप नेते अमित मालवीय यांनी सांगितलं की, एपलकडून स्पष्टीकरण येण्याची वाट का बघत नाहीत. गोंधळ आपोआप संपेल. आक्रोश कऱण्याची संधी हवी आहे का. मोबाईल कंपनी एप्पलच्या सूत्रांनी सांगितले की, अल्गोरिदमच्या त्रुटीमुळे हे मेल आले आहेत. याबाबत लवकरच कंपनीकडून अधिकृतपणे कळवले जाईल.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या