Monday, April 28, 2025
HomeमनोरंजनMain Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेतील 'या' अभिनेत्याला ओळखलत...

Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेतील ‘या’ अभिनेत्याला ओळखलत का?

मुंबई । Mumbai

भारताचे माजी पंतप्रधान, एक मितभाषी नेतृत्व, कवी, संवेदनशील व्यक्तिमत्व आणि जगन्मित्र अशी ज्यांची ख्याती आहे. अशा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येणार आहे.

- Advertisement -

आज अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त या चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते पंकज त्रिपाठी, अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील पंकज त्रिपाठी यांचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ‘

अभिनेता पंकज त्रिपाठीने सोशल मीडियावर तो व्हिडिओ शेअर केला. कुठेही डगमगले नाही, कुठेही माझे डोके झुकले नाही, मी एक अनोखी शक्ती आहे, मी स्थिर आहे. पंकज त्रिपाठी यांनी पंडित धीरेंद्र त्रिपाठी यांच्या कवितेच्या काही ओळी लिहून आपली भावना व्यक्त केली.

इतकंच नाही तर त्यांनी सांगितले की हे अनोखे व्यक्तिमत्व पडद्यावर व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी आभारी आहे #MainAtalHoon.तसेच सांगितले की, ते या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे आणि हे पात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक पात्र आहे. अटलजींचे व्यक्तिमत्त्व पडद्यावर जिवंत करणे ही एका परीक्षेपेक्षा कमी नाही. मात्र या परीक्षेत त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, असा आमचा ठाम विश्वास आहे. #MainATALHoon लवकरच. असं पंकज त्रिपाठीने त्या पोस्ट मध्ये सांगितले आहे.

मराठी दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...