जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट, दाणा बाजार, सुभाष चौक आदी परिसर नागरिक व वाहनानी ओव्हरफ्लो झाल्याचे सोमवारी दिसून आले. वारंवार सूचना देवून, लॉकडाउन केल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. नागरिक वारंवार गर्दी करतात. यामुळे कोरोनाला अटकाव होणार कसा असा प्रश्न मनपा व जिल्हा प्रशासनाला पडला आहे.
सुभाष चौक, राजकमल चौकात गर्दी
शहरातील सुभाष चौक, राजकमल टाकीज चौक, बोहरा गल्ली, तिजोरी गल्ली, मसाला गल्ली तसेच बळीराम पेठ, घाणेकर चौक, शनिपेठ, बालाजीपेठ परिसरात मोठी गर्दी खरेदीदारांसह नागरिकांची गर्दी दिसून आली. यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे आदी गोष्टींचे पालन करायला नागरिकांजवळ वेळच नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. अनेक दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचेही निदर्शनास आले.
दाणा बाजारात वाहने
येथील दाणा बाजार हे क्षेत्र नो व्हेईकल झोन म्हणून सकाळी 11 ते सायंकाळी 5 पयर्र्त घोषित करण्यात आले आहे, असे असतांनाही अनेक वाहनधारक दाणा बाजारात आपली वाहने दाणा बाजारात आणतात, त्यामुळे दाणा बाजारही ओव्हरफ्लो झालेला दिसून आला. सायंकाळी उशीरापयर्र्त दाणा बाजारात वाहनांसह नागरिकांचीही रेलचेल दिसून येत होती.
तसेच सकाळी 11 ते सायंकाळी 5 पयर्र्त वाहनांना प्रवेशबंदी घोषित करण्यात आले असतांनाही अनेक वाहने दाणा बाजारात दिसून आली. यात दुचाकीपासून ते रिक्षा, फोरव्हिलर, अवजड वाहनांचाही समावेश होता. फुले मार्केटमध्ये एकूण 8 ते 10 प्रवेशद्वार आहेत. यापैकी फक्त दोनच प्रवेशद्वार तेही केवळ नागरिकांना आत जाण्यास व बाहेर येण्यास थोड्याच प्रमाणात उघडे केले आहेत. बाकी सर्व ठिकाणी पत्रे लावलेले आहेत. तेथून माणूस निघायला जागा नाही असे पत्रे लावलेले आहेत.
अशी स्थिती असतांना फुले मार्केटमध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर फुल गर्दी होती. मोठ्या प्रमाणावर फूटपाथधारक, हॉकर्स, विक्रेते यांचा सकाळपासून व्यवसाय सुरू होता. मनपा अतिक्रमण विभागाचे कुणीही या मार्केटमध्ये फिरकले नव्हते. यामुळे फूटपाथधारकांचा व्यवसाय चांगूला झाला.