Saturday, April 26, 2025
Homeधुळेडोंगरगाव येथे मक्याच्या शेतास आग : मका जळून खाक

डोंगरगाव येथे मक्याच्या शेतास आग : मका जळून खाक

डोंगरगाव । Dongargaon । वार्ताहर

शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथे एकाच आठवड्यात दोन शेतकर्‍यांचे विजेच्या तारांच्या (electrical wires)शॉर्टसर्किटमुळे (short circuit) मका पीक जळून (Maize crop burned) लाखोंचे नुकसान (Millions of losses) झाले. कैलास तुकाराम पाटील यांचे सुमारे तीन ते चार एकर शेतातील मका शॉर्टसर्किट झाल्यामुळे सुमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले. तलाठी बडगुजर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

- Advertisement -

photos : स्पार्किंग मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट, पाच महिलांचा होरपळून मृत्यू

दि. 18 एप्रिल रोजी सुनील पांडुरंग पाटील यांच्या दोन एकर शेतावर परीपक्व मका पीक होते. तेथे शॉर्टसर्किट मुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी विजवण्याचा प्रयत्न केला परंतु यश मिळाले नाही. त्यामुळे सुनील पाटील यांचे काका हिम्मतराव त्र्यंबक पाटील यांनी वीज वितरण अधिकारी यांना फोन केला. त्यानंतर घटनास्थळी वायरमन आले.

12 हजारांची लाच घेताना कोतवालासह पंटर जाळ्यातपारोळ्यात घरफोडी : एक लाखाचा ऐवज लंपास

वीज वितरण अधिकार्‍यांनी अग्निशमन कक्ष धुळे येथे कळविले. व अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत शंभर टक्के पीक जळून नष्ट झाले होते. त्यानंतर नरडाणा पोलीस विभागास खबर मिळाल्याने संध्याकाळी पोलीस नाईक विजय पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी येवून पंचनामा केला.

दोन्ही शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले असून याला वीज वितरण कंपनी जबाबदार आहे. कारण या परिसरात 50 वषार्ंहून अधिक असलेल्या तारा जीर्ण व जमिनीकडे सैल झालेले असून पोल सुद्धा वाकडे झालेले आहेत याची कोणीही दखल घेत नाहीत म्हणून शासनाने शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

मेणबत्ती कारखान्यातील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...