Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधमाझा मर्‍हाटाची बोलू कौतुके।

माझा मर्‍हाटाची बोलू कौतुके।

संतश्रेष्ठ ज्ञानेश्ककपवर महाराज यांनी प्रत्येक मराठी माणसात मराठीचा अभिमान जागवला. अमृतापेक्षाही मायबोली मराठी श्रेष्ठ असल्याचा दाखला-माझा मर्‍हाटाची बोलू कौतुके।परि अमृतातेही पैजा जिंके।ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन॥असा दिला. भारतभूवर आलेल्या प्रत्येक अस्मानी-सुलतानी संकटांना महाराष्ट्राने प्राणपणाने तोंड दिले आहे.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात या भूमीतील अनेकांनी जीवाचे रान करून बाजी लावली आहे. म्हणूनच काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांच्या कवितेतील -निष्ठुर परसत्तेशी मग सतत जोमानेझुंज दिली टिळकांच्या याच महाराष्ट्रानेवीर विनायक, बापट, राजगुरू, कान्हेरेप्राणपणाने लढले क्रांतिसिंह हे सारे !ही भावना क्रांतिकारकांचा गौरव करते. ही भूमी डोंगरदर्‍यांची, पहाडांची, नद्यांची. तिला प्रणाम करताना गोविंदाग्रज म्हणतात-मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा… आपली महाराष्ट्र भूमी आपल्याला प्राणापेक्षाही प्रिय आहे. ज्येष्ठ कवी श्री.कृ.कोल्हटकर यांनी तरबहू असोत सुंदर संपन्न की महाप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा …!अशा शब्दात ही संपन्नता मांडली तर महाराष्ट्र गौरवपर कवितेत महाराष्ट्रभूमी ही अनेकांना संजीवनी देणारी असल्याचे सांगताना कवींद्र कुसुमाग्रज उत्कट शब्दात व्यक्त होतात -माझ्या मराठी मातीचा/लावा ललाटासी टिळाहिच्या संगाने जागल्या/मायदेशातील शिळा ! परंतु आज मराठी भाषा, मराठी अस्मिता आम्हा भूपुत्रांमध्ये कमी झाली की काय, अशी शंका येते. यात बदल घडविण्यासाठी गझलसम्राट सुरेश भट यांची कविताच सांगते की-लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!

अशा एकापेक्षा एक सरस कवितांतून मायभू महाराष्ट्राची महती जुन्या नव्या कवींनी वर्णिलेली आहे. त्या कविता आपल्याही स्मरणात असतीलच. त्यांना जागविण्यासाठीच हा शब्दप्रपंच!

- Advertisement -

रवींद्र मुकुंदराव मालुंजकर

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या