Saturday, May 4, 2024
Homeनाशिक‘माझे कुटूंब...' मोहीम करोनाच्या समूळ उच्चाटनासाठी उपयुक्त

‘माझे कुटूंब…’ मोहीम करोनाच्या समूळ उच्चाटनासाठी उपयुक्त

मालेगाव | Malegoan

मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम तालुक्यासह संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

करोनाच्या समूळ उच्चाटनासाठी ही मोहीम उपयुक्त असून या मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. ही मोहीम केवळ औपचारिक पध्दतीने राबवता कामा नये, असे निर्देश राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला दिले.

यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी व कार्यकर्त्यांनीही यात सहभाग नोंदवावा. मोहीमेच्या जनजागृतीसाठी होर्डींग्ज बॅनर लावून मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी.

मोहीमेतील पथकांमधील कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून त्यांना या मोहीमेच्या जबाबदारीची जाणीव करून सर्व नागरिकांची निकषाप्रमाणे तपासणी करण्याबाबत सुचित करण्यात यावे अशा सुचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.

तर गृहभेटीला आलेल्या पथकांना नागरिकांनी वस्तुनिष्ठ माहिती सर्वेक्षण पथकाला द्यावी, असे आवाहनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी केले.

तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील दाखल कोवीड रुग्णांची माहिती जाणून घेतांनाच उपलब्ध औषध साठ्याची माहिती देखील मंत्री श्री.भुसे यांनी जाणून घेतली.

तसेच करोनासाठी आवश्यक असलेल्या खाजगी मेडीकल दुकानांबाहेर उपलब्ध औषध साठा व त्यांच्या किमतींचे फलक दर्शनी भागात लावण्याबाबत नियमीत तपासणी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट होता कामा नये, यासाठी रुग्णालयाची देयके तपासणीकामी लेखापरिक्षकांची नेमणूक करण्यात यावी. रुग्णालयाच्या दर्शनी भागात विविध सेवांचे दर असलेला फलक लावण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या