Thursday, May 29, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! हगवणेचे मामा IPS जालिंदर सुपेकरांना गृहविभागाचा दणका; 'या' विभागांचा काढला...

मोठी बातमी! हगवणेचे मामा IPS जालिंदर सुपेकरांना गृहविभागाचा दणका; ‘या’ विभागांचा काढला कार्यभार

मुंबई | Mumbai
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणेने १६ मे रोजी आत्महत्या केली. सुनेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे, लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि सर्व कुटुंबाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. यातच आता वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाचे मामा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हे आरोपींना मदत करत असल्याचा आरोप कस्पटे कुटुंबियांनी केल्यानंतर गृहविभागाने सुपेकर यांना दणका दिला आहे.

- Advertisement -

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यासंदर्भातील अनेक पुरावे या आधीच माध्यमांसमोर आणले होते. त्यांची वादग्रस्त असल्याचे दाखवून दिले. विशेष म्हणजे 500 कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू असल्याची बाबही अंजली दमानिया यांनी निदर्शनास आणून दिली होती. तसेच, वैष्णवी प्रकरणात हगवणे यांच्याकडून जालिंदर सुपेकर यांच्या नावाने धमकी देत कस्पटे कुटुंबीयांवर व पोलिसांवर दबाव टाकल्याचेही समोर आले होते. त्यानुसार, आता जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येते. जालींदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर, नागपूर कारागृह उपनिरीक्षक पदाचा कार्यभार काढण्यात आला आहे.

जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे संभाजीनगर , नाशिक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आलाय. सुपेकर यांच्याकडून हा कार्यभार काढून अन्य तीन अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकरांवर आरोप झाल्यानंतर गृहविभागाने ही कारवाई केली आहे.

आदेशात काय म्हंटले आहे?
कारागृह उप महानिरीक्षक हे कारागृह विभागातील अत्यंत महत्वाचे व जबाबदारीचे पद आहे. सध्या कारागृह विभागाच्या कारागृह उप महानिरीक्षक या संवर्गात ०५ पदे मंजूर आहेत. त्यांपैकी ०२ पदे भरलेली असून ०३ पदे रिक्त आहेत. जालिंदर सुपेकर यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदाचा नियमित कार्यभार आणि कारागृह विभागातील “कारागृह उप महानिरीक्षक या संवर्गातील पाच पदांपैकी रिक्त असलेल्या तीन पदांचा (नाशिक विभाग, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर अतिरिक्त कार्यभार आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसोवा, महाराष्ट्र राज्य पुणे हे जबाबदारीच्या दृष्टीने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, या पदानंतर महत्वाचे पद आहे. त्यामुळे श्री. जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेल्या कारागृह उप महानिरीक्षक वा संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा (नाशिक विभाग, नाशिक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार ठेवणे प्रशासकीयरष्ट्या उचित नाही. तसेच, “कारागृह उप महानिरीक्षक या कनिष्ठ संवर्गातील पदाचा कार्यभार “विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे या वरिष्ठ संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या अधिका-याकडे सोपविणे योग्य नाही. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्याकडील “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कारागृह विभागातील इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, या तिन्ही पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या