Monday, November 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजरेल्वे तिकीट आरक्षण प्रणालीत मोठा बदल

रेल्वे तिकीट आरक्षण प्रणालीत मोठा बदल

नवे नियम १ नोव्हेंबरपासून होणार लागू

- Advertisement -

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

रेल्वे आरक्षणाचे तिकीट चार महिने अगोदर आरक्षित करण्याच्या पद्धतीत आता बदल करण्यात आला आहे. बदललेल्या पध्दतीनुसार प्रवासी ६० दिवस अगोदर ट्रेनमध्ये आरक्षण करू शकतात. यासंदर्भातील अधिसूचनाही रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी जारी केली. आता आगाऊ आरक्षणाची मुदत कमी करण्यात आली आहे. पूर्वी ही मुदत १२० दिवसांची होती, मात्र आता ती ६० दिवस झाली आहे.

रेल्वेचा १२० दिवस आधी तिकीट आरक्षित करण्याचा नियम आहे, पण भारतीय रेल्वेने आता ही प्रणाली बदलली आहे. नवीन प्रणालीनुसार, प्रवाशांना आता १२० दिवस नाही तर केवळ ६० दिवस आधी तिकीट आरक्षित करण्याची सुविधा मिळाली आहे . दरम्यान रेल्वेने तिकीट आरक्षणचा कालावधी हा १२० दिवसांवरून अर्धा म्हणजे ६० दिवसांवर आणला आहे. ही नवी प्रणाली १ नोव्हेंबरपासून लागू होईल.

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, आता ट्रेनमध्ये १२०नव्हे तर ६० दिवस आधी आरक्षण करता येणार आहे. भारतीय रेल्वेने अ‍ॅ‍ॅडव्हान्स रिझर्व्हेशन आरक्षण कालावधी कमी केला आहे. भारतीय रेल्वेचे हे नवे नियम १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या