Thursday, May 30, 2024
Homeदेश विदेशमोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड, ४० जण बेपत्ता

मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेल्या बसवर कोसळली दरड, ४० जण बेपत्ता

दिल्ली | Delhi

हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) भूस्खलन (Landslide) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशमधील किन्नौर (Kinnaur) जिल्ह्यातील निगुलसेरी येथे राष्ट्रीय महामार्ग-५ वरील चील जंगलजवळ ही भीषण दुर्घटना घडली आहे. (Major Landslide In Himachal’s Kinnaur,)

- Advertisement -

भूस्खलन होऊन कोसळलेल्या दरडीखाली प्रवाशांनी भरलेली बस आणि काही छोटी वाहनं ढिगाऱ्याखाली सापडल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये किमान ४० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (landslide in himachal)

हिमाचल प्रदेश रोड ट्रान्सपोर्टची बस (HRTC Bus) या ढिगाऱ्याखाली अडकली. हरिद्वारवरुन (Haridwar) बस निघाली होती. या दुर्घटनेत बस चालक बचावला आहे. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचावकार्यासाठी ITBP (Indo-Tibetan Border Police) चं पथक रवाना झालं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या