Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआडगाव भूसंपादन प्रकरणात मनपाला मोठा झटका; मनपाचे बँक खाते सील करण्याचे न्यायालयाचे...

आडगाव भूसंपादन प्रकरणात मनपाला मोठा झटका; मनपाचे बँक खाते सील करण्याचे न्यायालयाचे निर्देश

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आडगाव येथील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाने नाशिक महापालिकेला मोठा धक्का दिला आहे. जमीनमालकाला मंजूर झालेला सुमारे १८ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला अदा न केल्याने महापालिकेचे बँक खाते सील करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

मौजे आडगाव येथील गट क्रमांक ७७२/१/२/४ आणि ७७२/१/२/५ या जागांच्या भूसंपादनासाठी जमीनमालकाला यापूर्वी २०.४० कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. त्यानंतर वाढीव मोबदल्यासाठी राजेंद्र देवराम जाधव यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिल्यानंतरही रक्कम अदा करण्यात आली नाही.

याप्रकरणी यापूर्वी न्यायालयाने महापालिका आयुक्तांविरोधात अटक वॉरंट बजावले होते. मात्र, ५ ऑगस्ट रोजी या वॉरंटला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीत महापालिकेने पुनर्विचार प्रस्ताव तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. मात्र, न्यायालयाचे समाधान न झाल्याने महापालिकेचे बँक खाते सील करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे भूसंपादन प्रकरणात महापालिका प्रशासनासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...