Saturday, July 27, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करा: माजी आ. रघुवंशी

नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यासाठी नियोजन समितीत ठराव करा: माजी आ. रघुवंशी

नंदुरबार Nandhurbar । प्रतिनिधी

महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस The lowest rainfall झालेल्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचा समावेश आहे. शेतकर्‍यांनी दुबार पेरणी Double sowing करून सुध्दा पीक न उगवल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. यामुळे नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर Nandurbar district declared drought करण्यासाठी नियोजन समितीत ठराव Resolution in the Planning Committee करण्यात यावा, अशी मागणी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी Ex-MLA. Raghuvanshi यांनी केली असून याबाबत पालकमंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री Guardian Minister Na. Adv. KC Padvi, Collector Manisha Khatri यांना निवेदन देण्यात आले आहे.

- Advertisement -

सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस झाला असून यात नंदुरबारचा देखील समावेश आहे. शेतकर्‍यांनी दुबार पेरणी करून देखील पीक उगवले नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून पीक पेरणी केली होती. मात्र पाऊसच नसल्याने शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील सरकार शेतकर्‍यांचे असल्याने शासनाकडून शेतकर्‍यांच्या अपेक्षा आहेत. नंदुरबार जिल्ह्यात गावांना पिण्याचे पाणी सुध्दा मिळणार नाही, गुरांना जंगलात प्यायला पाणी शिल्लक राहणार नाही, ठराविक काही भागांमध्ये पाऊस पडतो आहे. परंतु जिल्ह्याचा काही भाग हा पावसापासून वंचित आहे. एखाद्या भागात पाऊस पडतो म्हणजे जिल्ह्यात पाऊस झाला असे नाही. पर्जन्यमापक यंत्र हे सर्व प्राथमिक केंद्राच्या भागाप्रमाणे बसविण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात भविष्यातील भिषण दुष्काळी संकट पाहता नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करावा व तसा जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव करावा, अशी मा गणी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी निवेदनातून केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या