Thursday, May 23, 2024
Homeमुख्य बातम्याअवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे डॉ. भारती पवार यांची मागणी

अवकाळीमुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे डॉ. भारती पवार यांची मागणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह (Stormy winds) अवकळी पाऊस (untimely rain) झाला.

- Advertisement -

त्यामुळे कांदा (onion) पिकासह गहू, हरबरा या रब्बी पिकांचे (rabbi crop) तसेच द्राक्षबागा व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (crop damage) झाले आहे. त्याअनुषंगाने अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे झालेल्या नुकसानीचे

तातडीने पंचनामे (panchnama) करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) पत्र देऊन केली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी दिली.

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे untimely rain कापणीला आलेला गहू, हरबरा व इतर रब्बी पिके भूईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या (Department of Agriculture) आकडेवारीनुसार जिल्ह्यातील दोन दिवसात बाधित झालेले १९१ गावे व संभाव्य बाधित होणाऱ्‍या गावांमध्ये अंदाजे २६०० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असल्याने कष्ठकरी शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

जिल्हाधिकारी यांचेमार्फत जिल्ह्यात वादळी वारे व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतींचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत. त्याचप्रमाणे कोणीही आपत्तीग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे, असे ही केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या