Friday, April 25, 2025
Homeजळगावसंविधान बचावासाठी डॉ.शिंदे यांना विजयी करा - मनोज पाटील

संविधान बचावासाठी डॉ.शिंदे यांना विजयी करा – मनोज पाटील

अमळनेर । प्रतिनिधी
आपली लढाई संविधान बचावासाठी आहे, देशात आज दलित, अल्पसंख्याक समाज दहशतीखाली वावरत आहे, आपण गांधी-नेहरू यांच्या विचारांचा पाईक असल्याने संविधानाच्या बचावासाठी महाविकास आघाडीचे अमळनेर विधानसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ.अनिल शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी केले आहे.

डॉ.शिंदे यांच्यावर काँग्रेसी विचारधारेचा प्रभाव आहे, त्यांनी पक्षाशी आपल्या विचारांशी कधीही गद्दारी केली नाही, विद्यमान मंत्री अनिल पाटील यांनी पक्षाशी गद्दारी केली, खा.शरद पवार, खा.सुप्रियाताई सुळे यांच्यावर अपमानजनक टीका केली हे अमळनेरची जनता विसरली नाही, पवार साहेबांच्या नावावर निवडून गेलेल्या या गद्दाराला अमळनेरची जनता या निवडणुकीत धडा शिकवेल यात शंका नाही. दुसरीकडे माजी आ.शिरीष चौधरी हे शिंदे सेनेचे डमी उमेदवार आहेत, आर्थिक विवंचनेत असणार्‍या चौधरिंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक लढवण्यासाठी 10 कोटी दिल्याची चर्चा आहे. अमळनेरची भूमी गद्दरांना साथ देणार नाही, त्यामुळे शहराच्या व तालुक्याच्या शांततेसाठी शांतताप्रिय काँग्रेसचे डॉ.शिंदे यांना विजयी करा, असे आवाहन मनोज पाटील यांनी केले.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...