Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedसकाळची भगर संध्याकाळी खाऊ नका-अन्न व औषध प्रशासनाची सूचना

सकाळची भगर संध्याकाळी खाऊ नका-अन्न व औषध प्रशासनाची सूचना

औरंगाबाद – aurangabad

नवरात्रीनिमित्त (Navratri) नागरिकांनी भगर (Bhagar), साबूदाणा, खाद्यतेल विकत घेताना ते पॅकबंद असल्याची खात्री करावी, अन्नपदार्थांवर लेबल व उत्पादकाचे नाव नसल्यास असे पदार्थ खरेदी करू नयेत. खरेदी करत असलेल्या वस्तूंचे उत्पादन दिनांक ब कालबाह्य तारीख तपासून घ्यावी, भगरीचे खुले पीठ बाजारातून विकत घेऊ नये तसेच सकाळी केलेली भगर रात्री खाऊ नका, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त अजित मैत्रे यांनी केले आहे.

- Advertisement -

नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. नवरात्रामध्ये महिला नऊ दिवसांचे उपवास करत असल्याने या काळात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलेली आहे. बाजारातही उपवासाचे विविध प्रकारचे पदार्थ विक्रीसाठी आलेले आहेत. परंतु, यातून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे उपवासाचे पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या विभागातर्फे करण्यात आलेले आहे. उपवासाच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने विविध पदार्थ बाजारात विक्रीला आले आहेत. परंतु, पदार्थ निकृष्ट दर्जाचे असतील तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊन फूड पॉयझन होऊन आरोग्याचा त्रास होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही तर काही पदार्थ हे उघड्यावरचे असतात. त्या पदार्थांमध्ये भेसळीचीही शक्यता नाकारता येत नाही. या काळात फळांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने रासायनिक प्रक्रिया करून फळे पिकवून त्यांची विक्री केली जात असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. पाकिटावरील सूचना ग्राहकांनी बारकाईने वाचाव्यात व त्यानंतरच खरेदी करावी, मिठाईजन्य पदार्थांचीही खरेदी पॅकिंगवरील सूचनेनंतरच करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

विक्रेत्यांसाठीच्या सूचना

अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांनी अन्न पदार्थांवर अन्न परवाना, अन्न नोंदणी क्रमांक नसल्यास अन्नपदार्थ खरेदी करू नये, खुली भगर किंवा विना लेबल असलेले भगरीचे पीठ विकू नये. ब्रँडेड, चांगल्या प्रतीची भगर विक्री करावी. मुदतबाह्य झालेले अन्न पदार्थ विक्री करू नये. अन्न व्यावसायिकांनी भगर उत्पादनाच्या नोंदणी, परवान्याशिवाय पीठ स्वत: तयार करून विक्री करू नये. खराब प्रतीची भगर व इतर खराब प्रतीचे अन्नपदार्थ खरेदी किंवा विक्री करू नये, अन्यथा संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या