Saturday, May 17, 2025
Homeनाशिकमालेगावी पुन्हा ३६ रुग्ण पॉझिटिव्ह; २१ पुरुष, १४ महिला आणि एका बालकाचा...

मालेगावी पुन्हा ३६ रुग्ण पॉझिटिव्ह; २१ पुरुष, १४ महिला आणि एका बालकाचा समावेश

मालेगाव | प्रतिनिधी 

- Advertisement -

मालेगाव आज पहाटे आलेल्या अहवालात आणखी ३६ रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे मालेगावातील रुग्णसंख्या १६० वर पोहोचली आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सव आनंद पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

यामध्ये चार रुग्ण दुसऱ्यांदा बाधित आढळून आले आहेत. यामुळे मालेगावमधील बाधित रुग्णांची संख्या १६० वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील रुग्णसंख्या १८२ वर पोहोचली आहे.

मालेगाव शहरातील रुग्णसंख्या १६० वर पोहोचल्याने सध्या चिंतेचे मळभ दाटले आहे. मालेगाव वासियांना काल सुखद घटनांनी दिलासा मिळाला असताना आज सकाळीच तब्बल ३२ रुग्ण वाढल्यामुळे जिल्ह्याच्या आकडा जवळपास १८२ वर पोहोचला आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये २१ पुरुष तर १४ महिलांचा समावेश आहे. या रुग्णामध्ये एका ९ वर्षीय बालकाचाही अहवाल सिद्ध झालेला असून मालेगावकरांची चिंता अधिकच वाढली आहे.

नाशिकमध्ये सध्या १८२ रुग्ण बाधित असून यामध्ये मालेगावात १६०, जिल्हा रुग्णालयात २३ डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ०२ रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १३ रुग्ण दगावले असून सर्व मालेगाव येथील आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास १० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामध्येही ७ रुग्ण मालेगावातील आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मद्यपी

Nashik News: मद्यपी तरुणीचा भर रस्त्यात राडा; रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांसमोर अश्लील...

0
नाशिक | प्रतिनिधी इंदिरानगर अंडरपासजवळ गुरुवारी (दि. १५) रात्री एका तरुणीने मद्यधुंदावस्थेत भररस्त्यात राडा घातला. रस्त्याने जाणा-या नागरिकांसमोर अश्लील हावभाव करीत तिने गैरवर्तन केल्याचा प्रकार...