Monday, May 19, 2025
Homeनाशिकधक्कादायक : मालेगावी माजी महापौराचा मृत्यू; सर्वत्र हळहळ

धक्कादायक : मालेगावी माजी महापौराचा मृत्यू; सर्वत्र हळहळ

मालेगाव | प्रतिनिधी 

- Advertisement -

मालेगाव शहरात आज पहाटे माजी महापौर हाजी मोहम्मद इब्राइम मोहम्मद यासिन नॅशनलवाले यांचे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. काल रात्री त्यांना श्वसनाचा आणि छातीत दुखू लागल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

शहरातील बडे व्यक्तिमत्व म्हणून हाजी मोहम्मद इब्राइम मोहम्मद यासिन नॅशनलवाले यांची ओळख होती. मालेगाव शहरातील नॅशनल ट्रव्हल्सचे ते संचालक होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष युसुफ हाजी यांचे ते मोठे बंधू होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

करोना विषाणूच्या उद्रेकानंतर शहरातील नागरिकांना त्यांनी घरातच थांबण्याचे आवाहन करत जनजागृती केली होती. शहरातील गोरगरिबांना नियमित त्यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू आणि साहित्याचे त्यांनी वाटप केले होते.

सामाजिक क्षेत्रातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या हाजी मोहम्मद इब्राइम मोहम्मद यासिन नॅशनलवाले यांचे अकाली निधन झाल्यामुळे मालेगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या