मालेगाव | प्रतिनिधी
महानगरपालिकेतील उपमहापौर दालनात लावण्यात आलेल्या टिपू सुलतानच्या प्रतिमे बाबत नगरसचिव व पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या पत्रावरून आपण दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती महेशचंद्र त्रिपाठी व न्या. अवैद शेठाणा यांच्या खंडपिठाने शासनाचे वकिलासह मनपा नगरसचिव व किल्ला पोलीस निरीक्षकांना एक आठाड्यात लेखी भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांनी दिली.
समाजबादी पार्टी गटनेते कार्यालयात आज पत्रकार परिषद घेत उपमहापौर शानेहिद यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती दिली. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न होते. त्यांनी संविधानात राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबरच म्हैसुर प्रांत शासक टिपू सुलतान यांचा फोटो देखील लावला आहे. त्यामुळे आपण टिपू सुलतान यांची प्रतिमा इतर महापुरूषांबरोबर लावली होती. मात्र या प्रतिमेस काही लोकांनी विरोध केला. तसेब मनपा नगरसचिव व पोलीस निरीक्षकांनी देखील पत्र दिल्याने आपण या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. संविधानात टिपू सुलतान बांचे छायाचित्र आहे. ते आपण लाबू शकत नाही को? असा प्रश्न आपण याचिकेव्दारे केला होता. सदर याचिका दाखल करण्यात येवून न्यायमुर्ती त्रिपाठी व शेठाणा यांच्या खंडपिठाने याचिकेचे अवलोकन केले. यावेळी शासनाचे वकिलाने १९६५ च्या जीआरमध्ये महपुरूषांचे फोटो लावावेत, असे नमूद केले असल्याचे व २००२ च्या जीआरमध्ये प्रतिमांसंदर्भात माहिती असल्याचे सांगितले.
यावेळी आपल्या वकिलाने युक्तीवाद करतांना संविधानात टिपू सुलतान यांचे छायाचित्र आहे मग त्यांची प्रतिमा लावणे चुकीचे आहे कां? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी न्यायमुतींनी या संदर्भात शासनाचे वकिलासह नगरसचिव व पोलीस निरीक्षकांना एक आठवड्याच्या आत आपले लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे म्हणणे मांडले गेल्यानंतर आमचे म्हणणे दाखल करण्याची देखील परवानगी न्यायमुर्तींनी दिली असल्याचे उपमहापौर शानेहिद यांनी सांगितले.
दरम्यान, उपमहापौर दालनातील टिपू सुलतान यांच्या प्रतिमेवरून शिवसेना भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. अशातच शासन मनपा नगरसचिव व पोलीस निरीक्षकांतर्फे उच्च न्यायालयात काय भुमिका मांडली जाते याकडे संपुर्ण शहराचेलक्ष लागले आहे.




