नाशिक \ प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा जीव की प्राण असलेला क्रीडा प्रकार म्हणजे बैलगाडा स्पर्धा. आंबेगाव, (ता. येवला) येथील ‘आमदार केसरी बैलगाडा शर्यती’ चा थरार क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळाला. या स्पर्धेत एक लाख एक हजार व ढाल असे प्रथम पारितोषिक आरोही करण साहेब राजेवाडी व राहुल झोडगे चाळीसगाव – जालना यांच्या ‘मल्हार’ व ‘शिवा’ या बैल जोडीने पटकावले.
आंबेगावचे माजी सरपंच आनंदा गिते मित्रपरिवार, आंबेगाव यांच्यातर्फे गुरुवारी (दि.२०) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण विधानपरिषदेचे आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून येवल्याचे माजी नगराध्यक्ष बंडूकाका क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,माजी जि. प. सदस्य डी.के.जगताप, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गणेश डोमाडे, मधुकर गायकर, बबनराव शिंदे, बाळासाहेब दराडे, आंबेगावच्या सरपंच अर्चना गिते, आनंदा गिते, पुंडलिक सोनवणे, सोमनाथ सांगळे, मनोज गिते,भाऊसाहेब सोनवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बैलगाडा शर्यतीचे समालोचन मयूर तळेकर यांनी केले तर झेंडा पंच म्हणून किरण तळेकर, संकेत मानकर, रोहन बंटी कदम यांनी काम पाहिले.
आंबेगाव येथील शंकर पटावर बैलगाडा शर्यतीचा थरार क्रीडा रसिकांनी अनुभवला. या क्रीडा स्पर्धेसाठी मुंबई, बारामती, संभाजीनगर,सातारा, संगमनेर, चाळीसगाव, जालना आदी ठिकाणाहून बैलगाडा मालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत या शर्यतीत सहभाग घेतला. या स्पर्धेत २४५ बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. प्रथम ३५ गटातून सात सेमीफायनल झाल्या. त्यातून फायनल ला सात बैलगाडा पोहोचले. यातून एक ते सात याप्रमाणे बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कार पटकाविलेले बैलगाडा मालक
द्वितीय पुरस्कार (७१ हजार रुपये व मानाची ढाल) – म्हसोबा प्रसन्न लोणी प्रवरा, केंद्राई माता खडकओझर व मोह ग्रुप सिन्नर यांचा घरचा साज – ‘पुष्पा व संभा’ बैलजोडी
तृतीय क्रमांक (७१ हजार रुपये व मानाची ढाल) – समीर शेठ भोईर मोठागाव, समाजसेवक संतोष शेठ तोडकर विटावा, मुंबई यांची ‘गोली’ व ‘साई’
बैलजोडी
चतुर्थ पुरस्कार (३१ हजार रुपये व मानाची ढाल) – सामत दादा प्रसन्न प्रेम उमाजी चव्हाण सातारा तांडा छत्रपती संभाजी नगर यांची ‘पुष्पराज व दबंग’ बैलजोडी
पंचम पुरस्कार (२१ हजार रुपये व मानाची ढाल) –
जय मिरावली फुलशेवरा संभाजीनगर अशोक भाऊ दराडे यांचा ‘पिस्टन’ आणि कृष्णा फॅन्स क्लब, सटाणा यांचा ‘पतंग’ बैल जोडी
सहावा पुरस्कार (१५ हजार रुपये व मानाची ढाल) – ओम साई प्रसन्न किरण वाघ, विकास राठोड, पारेगाव तांडा संभाजीनगर, शिर्डी निघोज व विकास राठोड बोरगाव तांडा संभाजीनगर यांची ‘चेंडू’ व ‘सुंदर’ बैल जोडी
– सातवा पुरस्कार (११ हजार रुपये व मानाची ढाल)- मतोबा प्रसन्न नैताळे सुनील भाऊ बोरगुडे घरचा साज व सुनील बोराडे यांची ‘बाटला’ व ‘शीट्टी’
बैलजोडी