Saturday, May 18, 2024
Homeनगरमाळीवाड्यात सहा जुगारी पकडले

माळीवाड्यात सहा जुगारी पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माळीवाडा (Maliwada) भागातील मिरफराके गल्लीत सुरू असलेल्या जुगारावर (Gambling) स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने छापा (Raid) टाकला. जुगार खेळणार्‍या सहा जणांना पकडले असून त्यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी, जुगाराचे (Gambling) साहित्य असा एक लाख सहा हजार 550 रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.

- Advertisement -

भगवान पोपट काळोखे (वय 28 रा. सारसनगर), किरण पोपट आरडे (वय 41 रा. माळीवाडा), मयुर दत्तात्रय शिंदे (वय 25 रा. काटवन खंडोबा), अंबादास महादेव चौधरी (वय 37 रा. मोहनीनगर, केडगाव), प्रशांत दिलीप भापकर (वय 23 रा. माळीवाडा), आकाश भरत जंगम (वय 23 रा. फुलसौंदर मळा, बुरूडगाव रस्ता) अशी पकडलेल्या जुगार्‍यांची नावे आहेत.

‘समग्र शिक्षा अभियाना’च्या 185 कर्मचार्‍यांचा कोंडमारा

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मंगळवारी (दि. 25) दुपारी कोतवाली हद्दीत अवैध धंद्यावर (Illegal Business) कारवाई कामी फिरत असताना त्यांना माहिती मिळाली की मिरफराके गल्लीत जुगार (Gambling) सुरू आहे. या पथकाने कोतवालीचे दोन अंमलदार व पंच सोबत घेत दुपारी साडे चार वाजता सदर ठिकाणी छापा (Raid) घातला असता सहा जुगारी मिळून आले. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.

निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजय धनेधर, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, कोतवालीचे गणेश धोत्रे व योगेश भिंगारदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

अंकुश चत्तर खून प्रकरण : आरोपींची रवानगी येरवडा कारागृहातपुरवणी बजेटमध्ये नेवाशाला भोपळा !

- Advertisment -

ताज्या बातम्या