Thursday, April 23, 2026
Homeनगरमाळीवाडा परिसरातील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा

माळीवाडा परिसरातील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा

पुरवठा विभागाची कारवाई || गॅस टाक्या व साहित्य जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील माळीवाडा परिसरात खालकर हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या घरगुती गॅसच्या टाक्यांमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुरवठा विभागाने छापा टाकून एकाला रंगेहाथ पकडले असून, गॅस टाक्या आणि उपकरणे असा 27 हजार 925 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पुरवठा निरीक्षक संतोष किसनराव घोलप (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी (28 मे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोलप 9 मे रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या कार्यालयात असताना सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सपना भोवते यांनी एलपीजी गॅसचे जिल्हा समन्वयक अधिकारी राजेशकुमार मिश्रा यांच्या कडून मिळालेल्या माहितीची कल्पना दिली. माहितीवरून माळीवाडा परिसरात एक इसम विनापरवानगी गॅस रिफिलिंग करत असल्याचे समजले. त्यानंतर सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भोवते, एडीएसओ मिनाश्री चौधरी, पुरवठा निरीक्षक तेजस पाटील, मिश्रा, सुनील धलपे, फिर्यादी घोलप आणि दोन पंच घटनास्थळी पोहोचले.

दुपारी 1.40 वाजता छापा टाकण्यात आला असता, एका प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षामध्ये घरगुती गॅस टाकीतून मशिनव्दारे गॅस भरताना एक इसम दिसून आला. त्याचे नाव आकाश कैलास साळवे (रा. कोठी, स्टेशन रस्ता, अहिल्यानगर) असे सांगण्यात आले. छाप्यात गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक प्रेशर पंप, इलेक्ट्रिक वजन काटा, दोन इलेक्ट्रिक बॅटर्‍या, तीन नोझल असा एकूण 27 हजार 925 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश साळवे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस अंमलदार शितल मुगडे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Assembly Elections 2026 : पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी दुपारपर्यंत ६२.१८ टक्के...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi देशातील आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले...