Thursday, August 20, 2026
Homeक्राईमCrime News : माळीवाड्यात तरूणावर चाकूने हल्ला

Crime News : माळीवाड्यात तरूणावर चाकूने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील माळीवाडा परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरूणावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी (26 जुलै) रात्री घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एका संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सुदाम उमाप (वय 31, रा. गाझीनगर, काटवन खंडोबा रोड, अहिल्यानगर) असे जखमी तरूणाचे नाव असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

रवी उत्तम साठे (रा. भूषणनगर, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद कार्यालयासमोर, माळीवाडा येथे घडली. फिर्यादी उमाप हे तेथे असताना संशयित रवी साठे याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने जवळील चाकूने फिर्यादीच्या हाताच्या कोपराजवळ वार करून त्यांना जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जखमी उमाप यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी; दुसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दुसर्‍या टप्प्यात 4 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली...