Thursday, May 15, 2025
Homeनगरमालुंजात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मालुंजात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा परिसरात पहाटे काकडा आरतीला गेलेल्या 14 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला रेशन दुकानात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी गणेश बबन जगताप (वय 22) याने मुलगी लहान 14 वर्षाची असतानाही तिला इंस्टाग्राम मोबाईल वर लव यू मेसेज पाठवून पाठलाग केला व पहाटे रेशन दुकानात पकडून नेले व अत्याचार केला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गणेश जगताप याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 (3) 376 (2) ळ, 354 अ, 354 ड व पोस्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी डीवायएसपी संदीप मिटके, सपोनि थोरात यांनी भेट दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident News : पेठच्या कुंभाळे फाट्यानजीक पुन्हा अपघात; दोघांचा मृत्यू,...

0
पेठ | Peth | वार्ताहर दोन दिवसांपूर्वी ज्या जागेवर मोटरसायकल अपघातात (Bike) २ तरुणांचा मृत्यु (Youth) झाला होता. त्याच ठिकाणाजवळ आज (गुरुवार) पुन्हा दोन मोटरसायकलींची...