Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे 'नॉट रिचेबल'

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे ‘नॉट रिचेबल’

मुंबई । Mumbai

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास कोसळला.

३६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. या सर्व प्रकरणात राजकीय वातावरण तापलं आहे.

दरम्यान, या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे सर्व कुटुंबासोबत घराला टाळे लावून गेले आहे. दोन दिवसांपासून ते नॉट रिचेबल झाले आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत सुरू असलेल्या त्यांचा मोबाईल क्रमांकही आता बंद आहे.

हे हि वाचा : आषाढ आणि श्रावणसरींनी मिटवली; नगर-नाशिककरांची समन्यायीची चिंता!

तसेच कल्याण पश्चिमेत त्यांचा कारखाना आहे. तो कारखाना देखील ताडपत्रीच्या साह्याने बंद करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जयदीप आपटेच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते. त्यामुळे आता जयदीप आपटे नेमका कुठे आहे आणि पोलीस त्याला कधी ताब्यात घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जयदीप आपटे अवघ्या २५ वर्षाचा तरूण असून कल्याण येथील रहिवाशी आहे. राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा २८ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. इतका मोठा पुतळा बनवण्यासाठी साधारणत: ३ वर्षांचा कालावधी लागतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.

हे हि वाचा : भाजपाला धक्का? शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांची सुचक प्रतिक्रिया

परंतु, हा पुतळा अवघ्या सात महिन्यात पूर्ण करण्यात आला. म्हणजेच गेल्या वर्षी जून महिन्यात हा पुतळा बनवण्यास सुरुवात झाली. तर, डिसेंबर २०२३ पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण झाले, अशी माहिती जयदीप आपटे यांनी स्वत: एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली.मुलाखतीत दिली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या