नाशिक | Nashik
प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या माणसांवरचं प्रेम व काहीतरी नवीन करण्याची धडपड यातून कलेला मिळालेली वाव, सहाय्यक प्राध्यापक ते थेट टि-सिरीजचा (T-series) गीतकार या खडतर प्रवासाचा धनी आज सर्वत्र आपल्या ‘सुवनमल्हार’ नावाने ओळखला जात असून हे वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन कर्तृत्वांगन सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका किर्ती निकम-जाधव यांनी केले…
Accident News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; टायर फुटल्याने कार उलटली
नाशिक येथील हाॅटेल वास्तु वाडा गंगापूर रोड (Gangapur Road) येथे आयोजित टि-सिरीजच्या पत्रकार परिषदेवेळी त्या बोलत होत्या. तब्बल अडीच वर्षांनंतर सुवन-मल्हार स्टुडीओकडून एक भन्नाट नवंकोर मराठी गाणं येत्या १० जुलैला प्रदर्शित होणार आहे. प्रा.नयन जाधव, सुवन आणि सुमित गिते अर्थात मल्हार या दोन्ही भावंडांच्या नावाने सुरू झालेला हा स्टुडिओ टि-सिरीजपर्यंत पोहचणारा पहिला स्टुडीओ ठरला आहे.
Union Cabinet : मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ
या गाण्याचे संगीतकार सुवन गिते हे असून गाण्याचे (Song) निर्माते ‘सुवनमल्हार’ हे आहेत. तर गाण्याचे दिग्दर्शन डॉ. उमेश सोनावणे यांनी केले असून यात अनिकेत जाधव, गौरी तिडके, शुभम घमंडी, प्रितई देवरे, मल्हार आणि विदुला यांनी काम केले आहे. तसेच या गाण्याचे छायांकन संवाद देशमुख यांनी केले असून प्रथम माळवदे यांनी फोटोशूट, पल्लवी ब्राम्हणकर सहनिर्मात्या, तर उर्मिला वाघ यांनी रंगभूषा केली आहे.
“औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच…”; निलेश राणेंची शरद पवारांवर जहरी टीका
दरम्यान, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगीतकार पंडित धनंजय धुमाळ, सिनेअभिनेत्री प्रिया सुरते, गायिका सीमा जाधव यांच्यासह आदी उपस्थित होते.