Wednesday, May 29, 2024
Homeनगरमांडवे बुद्रूक येथे गावठी कट्टा पकडला

मांडवे बुद्रूक येथे गावठी कट्टा पकडला

संगमनेर |प्रतिनिधी|Sangamner

गावठी कट्टा (Gavathi Katta) व जिवंत काडतुसे (Live Cartridges) बेकायदेशीर रित्या विक्री करताना पोलिसांनी (Police) चौघांना रंगेहात पकडल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता मांडवे बुद्रुक (Mandwe Budruk) येथे घडली.

- Advertisement -

याबाबत घारगाव पोलिसांकडून (Ghargav Police) समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील (Sangamner) मांडवे बुद्रुक परिसरातील एका हॉटेलमध्ये काही जण गावठी कट्टा (Gavathi Katta) विक्री करण्यासाठी उद्देशाने एकत्र जमले होते. या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे (Ghargav Police Station) पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे व त्यांचे सहकारी कर्मचारी मांडवे बुद्रुक येथे गेले.

सलग दुसर्‍या दिवशी सात महसूल मंडळात अतिवृष्टी

मांडवे बुद्रुक परिसरातील एका हॉटेल जवळ त्यांना हे तरुण आढळले. तीन जणांनी एकाकडून बेकायदेशीररित्या गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने घेतला होता असे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी याप्रकरणी चौघा जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 20 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचा कट्टा, 2 हजार 300 रुपये किमतीचे एक मॅक्झिन व तीन काडतुसे असा 22 हजार 300 रुपयांचा ऐवज असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी गावठी कट्ट्यासह (Gavathi Katta) इतर साहित्य जप्त केले.

रोहित पवार भाजपमध्ये येणार होते…

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष काशीनाथ कुटे (रा. मांडवे बुद्रुक, तालुका संगमनेर), शिवाजी बाबुराव कुदनर, संतोष शेवराज बर्डे (राहणार शिंदोडी, तालुका संगमनेर), रणजित बापु धुळगंड (रा. मांडवे बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 471/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 5, 7, 3 सह जिल्हाधिकारी यांच्या कडील आदेश मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1), (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करत आहे.

आव्हान-प्रतिआव्हानांनी ‘गणेश’ परिसर ढवळला !सार्वमत संवाद : पाणीपट्टी वसुली स्वतंत्रपणे करणार

- Advertisment -

ताज्या बातम्या