Saturday, May 17, 2025
Homeब्लॉगMangalagaur Special: : खेळात खेळ 'मंगळागौरी'चे खेळ...

Mangalagaur Special: : खेळात खेळ ‘मंगळागौरी’चे खेळ…

हसरा नाचरा जरासा ,लाजरा, सुंदर साजरा श्रावण आला श्रावण महिना आला की,प्रत्येकाच्या मुखातून या ओळी गुणगुणंल्या जातात धरीणीने हिरवा शालू नेसावा, आकाशातून टपोरी मोती पडावे ,पिकाने दिमाखात उभे राहावे , असा हा सगळ्यांना हवा हवासा वाटणारा महिना. नागपंचमी पासून सुरु होणारे माहेरवशिणेचे लाड आणि तेही ती करून घेते आणि जणू हिंदोळ्यावर झोके घेत, लग्नानंतरचा नविन आयुष्याचे स्वप्न रंगवत उंच भरारीचे स्वप्न ती पाहते. श्रावण महिन्यात तर अनेक विधी पूजा आणि सण साजरे केले जातात .असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नविन लग्न झालेल्या नवरीने पहिली पाच वर्षे हे व्रत करावयाचे असते .

श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नविन लग्न झालेल्या नवरीने पहिली पाच वर्षे हे व्रत करावयाचे असते .यासाठी अशाच नवोदय त्यांना बोलून एकत्रित पूजा करता व त्यानंतर रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. वेगवेगळे झाडांच्या पत्री या पूजेला वापरले जाते ही झाडे औषधे दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे म्हणून आयुर्वेदात मानले गेले आहेत. कणेरी, चमेली, जाई, डाळिंब, तुळस , दुर्वा, धोत्र ,बोर, कण्हेर, मका, रूई, शमी, शेवंती या झाडांची पाने पत्री म्हणून वाहिली जातात. पूजा करताना सोळा प्रकारच्या पत्री देवीला अर्पण करतात. ही मंगळगौरीची पूजा नवऱ्याच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थनेसाठी केली जाते.

- Advertisement -

पूजा करणाऱ्या नव्या नवरीला नटून थटून येतात काही हौशी मुली तर नऊवारी साडी आणि त्याला साजेसे दागिने ,आणि नाकात नथ घालतात. महादेवाची पिंड सजवून पूजा होईपर्यंत उपास केला जातो. नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मंगळागौरीची पूजा छान सजवली जाते. आणि वाट पाहताना ती रात्रीच्या जागरणाची मंगळागौर म्हणजे रात्रीच्या जागरणाची ओढ असते रात्रभर खेळून गाणे म्हणून हे मंगळागौर जागवली जाते यानिमित्ताने मुली माहेरी आणण्याचे प्रकार आहे मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी मैत्रिणींना आणि नातेवाईकांना भेटायचं एकमेकांशी बोलता यायचं, एकमेकींचा सासरच्या माणसांविषयी माहिती कलयाची थोडस गॅसीप व्हायचं , खेळ खेळाताना करंवटी,तर कधी सूप ,लाटंण असे घरगुती सामान वापरले जाते.

खेळातील गंमत आणि मजा मस्ती होतात. सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या (वटवाघूळ फुगडी,बस फुगडी, तवा फुगडी )सहा प्रकारचे आगोटे पागोटे या सर्व खेळ प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयव व्यायाम होत असे, खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल तर पूर्वीच्या काली केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंद चैतन्य देणारे व सामूहिक जीवनाचा आनंद मिळत असे.

सामान्यपणे स्त्रियांच्या पारंपरिक खेळातून ऋणानुबंधाची गोडी चाखायला मिळते अनेक वेळा सासुरवाशिणि गिताचा अमृत कुंभ रिता करतात,सासू-सासरे,नणंद याविषयी विशेष राग तर माहेर विषयी आई, भाऊ बहीण वडील याबद्दलची आत्मीयता मुख्यपणे या गाण्यातून सागंतात डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी अगदी योग्य शब्द वर्णन केला आहे. त्या या सृजनाला स्त्रियांचं वंशपरंपरागत धनच म्हणतात.

“काथवट कणा ग ,तीच्या पाठीचा गेलाय कणा ग ,पाठीचा गेलाय कणा गं,हिला चौघी सुना गं हिला डॉक्टर कोणी आणा गं” यामध्ये बदलत्या काळानुसार सासु सुनेचा नात्यात झालेला बदल टिपलेला दिसतो चार-चार सुना असून तिचा कणा मोडलाय म्हणजे इलाज काम करावे लागते असं यातून सुचवायचं असतं आणि चार सुना असून कोणीतरी डॉक्टरला आणा अशी विनवणे म्हणजे सुनांचा दुर्लक्ष हा भाग चतुराईने सुचित केला आहे.

तसेच काही गाणं हे स्वयंपाक घराची निगडित आहे तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला अशी गाणी म्हणून खेळ खेळले जातात. अशीही मंगळागौर असते. आजच्या बदलता काळात याचे स्वरूप बदलला आहे पण गाणी आणि खेळ तशीच आहे फक्त आज हौस म्हणून हे खेळ खेळले जातात.

नोकरी करणाऱ्या महिला सुद्धा एखाद दिवस रजा घेऊन हे खेळ खेळताना दिसतात. कारण या खेळामध्ये एक आनंद मिळतो. पूर्वी घराच्या अंगणात हे खेळ खेळले जायचे, आज घराला अंगण नाही, पण हॉल घेऊन पण साजरा केला जातो सणाचे स्वरूप बदललं पण परंपरा अजूनही जपली जात आहे आणि पुढेही जपली जावी म्हणून या लेखनाचा अट्टाहास.

सणासुदीची घेऊन उधळण

आला हा हसरा श्रावण सौभाग्यवती

पूजिती मंगळागौर

खेळ खेळुनी पारंपारिकी थोर

आला श्रावण आनंद मनात मावेना

माहेरी जाण्याचे वेध लागे

गेल्या वाचून राहवेना,

हाती कडे पायी तोडे पैंजणांची रूणंझुणं

मधुर ध्वनीच्या नादामध्ये

भक्ती घरी

सोन पावलांनी आली गौरी घरी

सौ.आरती राजेश धर्माधिकारी नवी मुंबई

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १७ मे २०२५- उत्तरे शोधावीच लागतील

0
वातावरण अजूनही ढगाळ असले तरी अवकाळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. तथापि गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या कोसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक...