Sunday, May 26, 2024
Homeजळगावताप्ती लेडिज क्लबतर्फे मंगळागौर कार्यक्रम

ताप्ती लेडिज क्लबतर्फे मंगळागौर कार्यक्रम

भुसावळ (Bhusaval) । प्रतिनिधी

येथील ताप्ती लेडिज योगा क्लबतर्फे (Tapti Ladies Club) ‘श्रावणसंगे, चला खेळ खेळुया मंगळागौरीचा कार्यक्रम (Mangalore Program) उत्साहात पार पडला. शहरात पहिल्यांदाच या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पारंपारिक खेळातून (traditional game) होणार्‍या व्यायामातून स्त्रियांचे आरोग्य कसे जतन करता येईल हा यामागील उद्देश होता.

- Advertisement -

परंपरेतला आधुनिकतेची जोड देऊन सध्याच्या काळात स्त्रियानचे आरोग्य कसे जतन करता येईल याबाबत प्रा. डॉ. भाग्यश्री भंगाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन मार्गदर्शन केले. यावेळी आनंदी ग्रुपच्या संचालिका मृणाली गाडगीळ व त्यांच्या सहकार्‍यांनी उत्साहात मंगळागौरीच्या पारंपारिक खेळाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात 200 महिलांनी सहभाग घेतला.

यावेळी ताप्ती लेडिज योगा क्लबचे उद्घाटन स्मिता फालक व रजनी सावकारे व मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रसंगी कल्पना फालक, जयश्री चौधरी, प्राचार्या मिनाक्षी वायकोळे, नीना कटलर उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी आरती चौधरी व स्वाती पाटील यांनी सहकार्य केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर गणेश वंदना प्रचीती कुलकर्णी व प्रतिक्षा कुलकर्णी यांनी सादर केले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पतंजली योग समिती कार्यकरणी सदस्य महानंदा पाटील, डॉ. मधू मानवतकर, डॉ. वंदना वाघचौरे, मंदाकिनी केदारे, अ‍ॅड. जास्वंदी भंडारी, शोभा तळेले उपस्थित होत्या.

यशस्वीतेसाठी सुरेखा तळेले, सुनीता सावकारे, लिला जोशी, उज्वला पाटील, सविता सुरवाडे, उज्वला नेहेते यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन डॉ. सुवर्णा गाडेकर, शितल निंबाळकर यांनी तर आभार सुनीता सवकारे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या