मुंबई । Mumbai
रेल्वेच्या दादर येथील 80 वर्षे जुने हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिसीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना “एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत” अशी खोचक टीका केली होती.
त्यांच्या या विधानावर भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. तच ठाकरेंच्या शिवसेनेचे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज हनुमान मंदिरात महाआरती करणार होते. दरम्यान, या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. हनुमान मंदिराला आलेल्या नोटीसीची आमदार मंगल प्रभात लोढा यांनी माहिती घेतली.
त्यानंतर रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून नोटीसीला स्थगिती देण्यात आली आहे. तर हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती सुरूच राहणार असे मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. आता स्थगिती उठवल्यानंतर आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात आरती करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता.