धुळे – प्रतिनिधी dhule
तालुक्यातील कापडणे येथील (Bhavani Mata) भवानी मातेच्या यात्रोत्सवात काल (Thief) चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत पाच महिलांचे मंगळसुत्र (Mangalsutra) लंपास केले.
- Advertisement -
अखेर ‘तुकडाबंदी’चे परिपत्रक खंडपीठात रद्दबातल
याप्रकरणी तिघा विधीसंघर्ष बालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापडणे येथे भवानी मातेचा यात्रोत्सव भरला आहे. त्यामुळे काल सकाळी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ही संधी साधत तिघा विधीसंघर्ष बालकांनी पाच महिलांच्या गळ्यातील ओमपान व मंगळसुत्र असा एकुण 47 हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत विजया महाजन यांनी (Songir Police) सोनगीर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो.ना.जाधव करीत आहेत.