Tuesday, March 25, 2025
Homeजळगावविकास कामांसाठी 30 हजार कोटींचा निधी खेचून आणला-आ.चव्हाण

विकास कामांसाठी 30 हजार कोटींचा निधी खेचून आणला-आ.चव्हाण

चाळीसगाव । प्रतिनिधी

जनतेतून विकास कामांच्या बाजूने व्यापक समर्थन मिळत असल्याने विकास कामे हीच आमदार मंगेश चव्हाण यांची जमेची बाजू असल्याचे आता दिसून येत आहे. अडीच वर्षाच्या कालावधीत सुमारे 3000 कोटी निधी तालुक्यासाठी मंजूर करून आणलेले आमदार म्हणून देखील आमदार मंगेश चव्हाण यांचा तालुक्यात भर लौकिक झाला आहे. चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार मंगेश चव्हाण यांनी खेचून आणत चाळीसगावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न केला आहे.

- Advertisement -

आमदार मंगेश चव्हाण यांच्या दुरदृष्टी आणि संकल्पनेतून शहरातील सर्व महत्त्वाच्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले असून महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. शहरात असलेल्या विविध अशा आठ महत्वाच्या शासकीय कार्यालयांना एकाच छताखाली आणून भव्यदिव्य अशी प्रशासकीय इमारत उभारली आहे. चाळीसगाव येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालय मंजूर करुन आणले आणि तत्काळ सुरू करुन वाहनधारकांची गैरसोय दुर केली आहे. तालुक्याला एम एच 52 च्या रुपाने नविन ओळख निर्माण करुन दिली आहे. रस्ते व पुल उभारणी साठी आ.मंगेश चव्हाण यांनी 881 कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी आणून चाळीसगाव तालुक्यात सगळीकडे सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते आणि विविध लहान मोठ्या पुलांचे बांधकाम करुन रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

याबाबत देखील मतदार समाधानी दिसत आहेत. यासोबतच क्रिडा, परिवहन, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, विज, शासकीय इमारती, शहर विकास, कृषी क्षेत्र, रस्ते पुल, सिंचन जलसंधारण व पाणीपुरवठा, सुशोभीकरण यांसह सर्वच क्षेत्रात हाजारो करोड रुपयांची कामे प्रगतीपथावर असून येणार्‍या काळात देखील यापेक्षा जास्त कामे करणार असल्याचे मतदारांसमोर मांडून आ.मंगेश चव्हाण यांनी एक विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीत उतरले असल्याने त्यांची ही भुमिका मतदारांना भावत आहे. म्हणून चाळीसगाव मतदारसंघात मतदारांमध्ये फक्त आणि फक्त मंगेश चव्हाण आणि विकासकामे यांचीच चर्चा होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...